पुण्यात निर्बंधाची स्थिती जैसे थेच असणार

कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका लक्षात घेता येत्या आठवड्यात पुण्यात निर्बंधाची स्थिती जैसे थेच असणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल होतील अशी अपेक्षा पुणेकरांना होती. मात्र पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात तूर्तास जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहणार आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.

निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दरचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तूर्तास जे निर्बंध लागू आहेत तेच पुढे लागू राहतील, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. तसेच शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असंही नमूद केलं.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “पुणे जिल्ह्यात लसीकरण वेगानं सुरु आहे. परदेशात तिसरी लाट फार वेगाने वाढलीय आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताहेत हे थांबलं पाहिजे. लहान मुलांना धोका जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.”

पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली गेली.

पुण्यात सोमवारपासून काय सुरू?

शनिवारी रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा.
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील
रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा/घरपोच सेवेसाठी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार
विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करणार
नाट्यगृहे, चित्रपटगृह बंदच राहणार
5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार
कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.