नाशिक महापालिकेच्या बससेवेची ट्रायल पूर्ण

शहर मनपाची बस सेवा 1 ते 10जुलै दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. नाशिक शहरात तील बस सेवा सुरू करण्याबाबत मनपा आयुक्त कैलास जाधव घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे या बस सेवेच्या उद्घाटनाला फडणवीस यांना बोलवण्याचे प्रयत्न भाजपच्यावतीने करण्यात येत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटनाला बोलवण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या बससेवेचा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बससेवेचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांची तारीख निश्चित झाल्यावर नाशिक मनपा बससेवा प्रकल्पाचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाची असलेल्या नाशिक महापालिकेच्या बहुचर्चित बससेवेची ट्रायल रन पूर्ण झाली आहे. प्रवाशांची चढ उतार करून बस धावल्या. 1 ते 10 जुलै पासून प्रत्यक्ष बससेवेला सुरुवात होणार आहे.

शहरातील पाच मार्गांवर पहिल्या टप्प्यात बस धावणार आहेत. अडीच वर्षांपासून रखडलेल्या बस सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रकल्प साकारण्यात आला आहे. सर्वपक्षीय विरोधानंतर देखील बससेवेला हिरवा कंदील देण्यात आला होता.

महाराष्ट्रासह देशातील कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. रेल्वे प्रशासनानं काही गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मनमाड आणि नाशिककरांची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस होणार सुरू करण्यात येणार आहे. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस 26 जून पासून सुरु करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.