अफगाणिस्तानवर तालिबानचा
कब्जा ; राष्ट्रपती पळाले
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला असून ते ताजिकिस्तानला रवाना झाले होते. मात्र त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अशरफ घनी आता अमेरिकेत जाऊ शकतात. अशा परिस्थितीत अशरफ घनी सध्या ओमानमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.
तालिबानकडे केला
चीनने मैत्रीचा हात पुढे
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देखील देश सोडला आहे. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडला आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये भयानक चित्र आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचं चित्र आहे. संपुर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर चीनने तालिबानकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. चीनच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी ही माहिती दिली.
काबूलमधील शाळा, महाविद्यालये
कार्यालये सर्व काही बंद
तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी कब्जा करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अफगाणिस्तानमधील विद्यापिठांमधील प्राध्यकांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यीनींना निरोप दिला. यासंदर्भात बोलताना एका तरुणीने प्राध्यापकांनी आपण कदाचित यापुढे कधीच भेटणार नाही असं सांगितल्यावर धक्काच बसल्याचं म्हटलं. काबूलमधील शाळा, महाविद्यालये, कार्यालये सर्व काही बंद करण्यास सुरुवात झालीय.
पाऊस राज्यात
पुन्हा सक्रिय होणार
पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये राज्याच्या कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पावसाची शक्यता आहे.
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा
सुष्मिता देव यांचा राजीनामा
गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसमधून काही मोठे नते बाहेर पडले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसच्या खासदार आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर देखील काँग्रेसच्या माजी नेत्या असा उल्लेख करण्यात आला आहे. पक्षाच्या एका विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करत असल्याचं सुष्मिता यांनी म्हटलं आहे.
मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्या
घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला चढवल्याने शिलाँग आणि मेघालयच्या काही भागातली परिस्थिती चांगलीच चिघळली आहे. आत्तापर्यंत कोणतीही हानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली तर शिलाँगच्या काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. चार जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली आहे.
घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर
पंकजा मुंडे संतापल्या
प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न मिळल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. पंकजा मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं. काय अंगार-भंगार घोषणा लावलीय? जेवढ्या उंचीची मी तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, नाहीतर मला भेटायला यायचं नाही”; असे म्हणत पंकजा संतापल्या.
लायकीत राहायचं नाहीतर
पुण्यात फिरणे मुश्किल करू
राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केली होती. त्यांच्या या टीकेला आता प्रत्युतर देण्यात आलं आहे. पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आता गायकवाड यांना धमकी दिली आहे. वसंत मोरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, “२०१९ च्या लोकसभेला पुण्यातून इच्छुक असणारा तू… मी स्वतः पाहिलंय तुला गल्लोगल्ली फिरत सांगत होतास की, “मी प्रवीण गायकवाड” ,”मी प्रवीण गायकवाड”… अरे, तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू…”
टीम इंडिया चौथ्या दिवसअखेर
६ गडी गमावून १८१ धावा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी लॉर्ड्सवर खेळली जात आहे. आज या कसोटीचा शेवटचा दिवस असून सामना रोमांचक स्थितीत आहे. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ६ गडी गमावून १८१ धावा केल्या. आता भारताने पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंतला (२२) गमावले. रॉबिन्सनने त्याला बाद केले. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी फलंदाजीसाठी मैदानात आहे. भारताकडे १७३ धावांची आघाडी आहे. अजिंक्य रहाणेने ६१ आणि चेतेश्वर पुजाराने ४५ महत्त्वपूर्ण धावा केल्या. वेगवान गोलंदाज मार्क वुडने इंग्लंडसाठी आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत.
SD social media
9850 60 3590