शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने मुंबईला विजयासाठी 199 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 186 धावाच करता आल्या. पंजाबच्या या विजयासह मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला.
मुंबईकडून ब्रेविसने 49 धावांची खेळी केली. सूर्युकमार यादवने 43 धावांचं योगदान दिलं. तिलक वर्माने 39 रन्स केल्या. तर कॅप्टन रोहित शर्मा 28 धावा करुन माघारी परतला.
पंजाबकडून ओडियन स्मिथने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडाने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच वैभव अरोराने 1 विकेट मिळवली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थंपी.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोडा आणि अर्शदीप सिंह.