नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत दाखल झाल्यानंतर आयएनएस विक्रांतमध्ये अपहार केल्याचे आरोप फेटाळून लावले. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्याने त्यांनी न्यायमुर्तींचे आभार मानले. यावेळेस त्यांनी माझ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सागंण्यावरुन खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही केला. तसेच लवकरच महाविकास आघाडीतील डर्टी डझन नेत्यांचा घोटाळाही बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मविआ नेत्यांचा होमवर्क होण्यासाठी नॉट रिचेबल व्हावं लागतं”,असं सोमय्या म्हणाले”. ते मुंबई विमानतळावर बोलत होते. यावेळेस त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
आयएएनस विक्रांतमध्ये मी एका दमडीचाही घोटाळा केला नाही. राऊंतांकडे भ्रष्टाचाराबाबात कोणताही पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करायची”, अशा शब्दात सोमय्यांनी राऊंताच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांना उत्तर दिलं.
“ठाकरे सरकारमधील डर्टी डझनचे घोटाळे बाहेर काढणार, मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार. घोटाळेबाजांना मुक्ती मिळणार नाही”, असा इशाराही सोमय्यांनी यावेळेस दिला.