राज्यात नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. करोनामुळे स्थगित केलेली शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुधारित आकृतिबंध मंजूर करून घेतलेल्या विभागांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100% आणि आयोगाच्या कक्षेबाहेरील 50% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनावरील तसंच निवृत्तिवेतनावरील वाढता खर्च लक्षात घेता, राज्य सरकारने रिक्त पदभरती आणि नवीन नोकरभरतीबाबत संथगतीने वाटचाल सुरू ठेवली होती.

पूर्व रेल्वेने 2972 ​​अपरेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डाचे 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये 8 वी पास असलेले नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे.

नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला अधिकृत अधिसूचनेजवळ ऑनलाइन अर्जाची लिंक (https://rrcrecruit.co.in/rrceraprt22/) दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर सर्व माहिती भरून, प्रमाणपत्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.

ही नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदांवर गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.