विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.
यासाठी नियमांत बदल करण्यात येणार आहेत. याबाबतचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने वेबसाइटवर प्रसिद्ध केला असून याबाबत सूचना 31 मार्चपर्यंत मागविल्या आहेत. बारावीनंतर चार वर्षांचे पदवी शिक्षण घेऊन संशोधन अथवा ऑनर्सची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’ला प्रवेश घेता येईल, असा प्रस्ताव ‘यूजीसी’ने आणलाय.
याआधी यूजीसीच्या नियमानुसार विद्यार्थ्याला पदवी प्राप्त केल्यानंतर एम ए ही पदवी घ्यावी लागायची. किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त करावी लागत होती. त्यानंतर त्याला पीएचडी साठी प्रवेश मिळत होता. आता मात्र तशी आवश्यकता राहिलेली नसल्याचे यूजीसीच्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये म्हटले आहे. या नव्या धोरणात पदवीनंतर थेट पीएचडी करण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
यूपीएससी विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.https://upscgoal.com/