‘ओबीसी आरक्षणासाठी खंबीर पावलं उचला’, पंकजा मुंडेंच्या शिंदे-फडणवीसांना सूचना

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ओबीसींचं आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. याच मुद्द्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर सूचक विधान केलं आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी, अशी सूचना पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

“काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे”, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील? असा प्रश्न अनेकांना होता. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन या निवडणुकांचा मुद्दा प्रचंड गाजला होता. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप सूटलेला नाही. पण सुप्रीम कोर्टाने या निवडणुकांबाबत महत्त्वाचा आदेश दिला होता. पावसाचं नियोजन करुन आठ-पंधरा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना कोर्टाने दिला होता. कोर्टाने 17 मे रोजी याबाबतचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायचीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार असल्याने भर पावसात या निवडणुका होण्याची चिन्हं आहेत.

सुप्रीम कोर्टाने 17 मे 2022 रोजी महत्त्वाचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत त्याठिकाणी आणि तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा. तसेच आवश्यक असल्यास परिस्थितीनुसार त्यात बदल करवेत, असे आदेश कोर्टाने दिले होते. याच आदेशानुसार भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन निवडणुकीचा कार्यक्रम ठरविल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे.निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा आणि 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्याबाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ज्या नगरपरिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या भागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.