या पृथ्वीवर विविध प्रकारचे लोक आढळतात. कुणाचा रंग आणि नाक वेगळे. त्याचप्रमाणे अनेकांचे डोळे लहान असतात. जे पाहून लोक अनेकदा विचारात पडतात. मनात सर्व प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागतात. उदाहरणार्थ, लहान डोळे असलेल्या लोकांना पाहण्यात अडचण येते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देताना नागालँडच्या भाजपचे अध्यक्ष तेमजेन इनमा यांनी अशा गोष्टी सांगितल्या ज्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नागालँड भाजप अध्यक्ष तेमजेन इमना अलांग यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, माझा भाऊ पूर्ण फॉर्ममध्ये आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच इंटरनेटवर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा पूर आला होता.
नागालँडचे मंत्री तेमजेन इनमा यांनी सार्वजनिक भाषणात ‘लहान डोळे’ असण्याचे फायदे सांगितले. राज्याचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री इनमा म्हणाले की, लोक सहसा म्हणतात की ईशान्येकडील लोकांचे डोळे लहान असतात. त्यांचे डोळे लहान असले तरी त्यांची दृष्टी खूप तीक्ष्ण आहे. ते पुढे म्हणाले की, माझे डोळे लहान असल्याने माझ्या डोळ्यात घाण कमी आहे. तसेच जेव्हा जेव्हा एखादा लांबचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा मी सहज झोपू शकतो आणि कोणालाच कळत नाही.