बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार याच्याबद्दल सर्वांना ठाऊक आहे की, तो एका वर्षात अनेक चित्रपट करतो. रोमँटिक, अॕक्शन आणि विनोदी चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणार्या अक्षयचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये समावेश आहे, हे आपणा सर्वांनाच माहित असले. पण, अक्षयच्या नेट वर्थबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. अक्षय कुमार हा असा बॉलिवूड स्टार आहे, ज्याने स्वतः खूप मेहनत आणि संघर्ष करून स्वतःचे हे खास स्थान बनवले आहे.
Caknowledge.com वेबसाईटच्या अहवालानुसार बॉलिवूडचा ‘हिट मशीन’ अभिनेता अक्षय कुमार याची सध्याची संपत्ती तब्बल 2000 कोटी आहे. अक्षयची मासिक कमाई तब्बल 4 कोटींपेक्षा जास्त आहे, तर वर्षासाठी 40-50 कोटी आहे. अक्षयची बरीचशी कमाई ही ब्रँड अॅन्डॉर्सेसमधून झाली आहे. अक्षय प्रत्येक अॅन्डॉर्समेंटसाठी 6 कोटी मानधन घेतो. या व्यतिरिक्त तो चित्रपटाच्या नफ्यातलाही मोठा भाग घेतो. त्याचे एका वर्षात किमान 4-5 चित्रपट रिलीज होतात.
अक्षय कुमारचे मुंबईच्या जुहू या प्राईम बीचवर लक्झरी बंगला आहे. त्याच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. याशिवाय त्याच्याकडे देश-विदेशात देखील अनेक मालमत्ता आहेत.
Caknowledge.com च्या अहवालानुसार अक्षय कुमारकडे 11 लक्झरी वाहने आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, बेंटली, होंडा सीआरव्ही आणि पोर्श या ब्रॅण्ड्सच्या गाड्या आहेत. अक्षयला बाईक्सचीही आवड आहे आणि म्हणूनच त्याच्याकडे बर्याच मोठ्या ब्रॅण्डच्या बाईकसुद्धा आहेत.
अक्षयच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्याचा शेवटचा चित्रपट ‘लक्ष्मी’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. सध्या अक्षयकडे रिलीजसाठी अनेक चित्रपट सज्ज आहेत, पण लॉकडाऊनमुळे सर्व विलंब होणार आहेत. ‘सूर्यवंशी’, ‘बेल बॉटम’, ‘पृथ्वीराज’, ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘राम सेतु’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांमध्ये त्याची एक वेगळी शैली दिसणार आहे.