पश्चिम बंगालच्या जुलपाईगुडीमध्ये मैनगुडी परिसरात रेल्वेला मोठा अपघात झाला आहे. बिकानेर एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली आहे. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. बिकानेस एक्स्प्रेसचे चार डबे घसल्यानंतर त्यातील काही डबे पूर्ण पलटी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णलयात दाखल करण्यात येत आहे. घटनास्थळी वेगवान बचावकार्य सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अद्याप तरी थोडासा दिलासा मिळाला आहे. अचानक झटका बसला आणि डबे उलटले अशी माहिती प्रवाशांकडून देण्यात आली आहे.
या अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही, अपघात कसा? डबे कसे उलटले याबाबत अधिकृतरित्या प्रशासनाची किंवा रेल्वेची काहीही माहिती समोर आली नाही. काही वेळातच प्रशासनाची बाजू समोर येऊ शकते, रेल्व किंवा स्थानिक प्रशासन अपघाताबाबात आणि जखमी प्रवाशांबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. या अपगातात नेमके किती प्रवाशी जखमी झाले? हेही अद्याप अस्पष्टच आहे.