लोकसभेसाठी भाजपचं मिशन 45! सेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्यासाठी केंद्रीय मंत्री रिंगणात

बारामतीही लक्ष्य

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्तावत भाजपने अनेक राज्यांमध्ये आपलं सरकार स्थापन केलेलं आहे. आता महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन 45 राबविण्याची भाजपची तयारी सुरू झाली आहे. राज्यातील सत्तातरानंतर आता याची सुरूवात लवकरच होत आहे. पवारांचं प्राबल्य असलेल्या बारामतीवर भाजपचं विशेष लक्ष आहे.

राज्यात सत्तांतर होताच भाजपने आपलं मिशन सुरू केलं आहे. याच निमित्ताने 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर असणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा त्या आढावा घेणार आहेत.

भाजपच्या या मिशनअंतर्गत महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघांत केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. त्या अंतर्गत निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर जात आढावा घेणार आहेत. तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा 11 ते 13 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत. भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. पैकी 10 मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्याचं भाजपचं लक्ष्य असल्याचं स्पष्ट आहे.

कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?

बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.