लग्न किंवा आई झाल्यानंतर अभिनेत्रींच्या करियरला ब्रेक लागतो, अशी यापूर्वी कलाविश्वाची समज होती. पण आता ते विचार पूर्णपणे बदलले आहेत. लग्न आणि 2 मुलांची आई झाल्यानंतर अभिनेत्री करीना कपूरच्या करियरने वेग धरला. आज करीनाकडे एकापेक्षा एक चांगले प्रोजेक्ट आहेत. करीनाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती ‘वीरे दी वेडिंग 2’ आणि हंसल मेहता दिग्दर्शित एका चित्रपटात काम करत आहे.
यासोबतचं तिच्याकडे एक नव्या चित्रपटासाठी ऑफर आली आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘सीता’. चित्रपटाची भूमिका पूर्णपणे सीता या भूमिके भोवती फिरताना दिसणार आहे. चित्रपटची घोषणा केल्यानंतर ‘सीता’ या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री करीना कपूर.
मीडिया रिपोर्टनुसार करीनाला चित्रपटाची कथा आवडली आहे. पण करीनाने ‘सीता’ या भूमिकेसाठी 12 कोटी रूपयांची मागणी केली आहे. सांगायचं झालं तर करीनाकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी करीना वेळ देवू शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून निर्माते आणि दिग्दर्शक ‘सीता’साठी करीनाची निवड करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.