जुम्मा चुम्मा गर्ल सध्या काय करते….

80-90 च्या दशकात आपल्या अनोख्या शैलीनं चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री किमी काटकर. किमी त्या काळातील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी होती. किमीनं चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं मात्र आज ही अभिनेत्री सिनेमातून पूर्णपणे गायब झाली आहे. किमीचे बोल्ड फोटो दहशत निर्माण करायचे. आज ही अभिनेत्री पूर्णपणे तिचे वैयक्तिक आयुष्य जगत आहे.

नुकतंच किमीचे काही फोटो व्हायरल झाले होते, हे पाहून चाहत्यांना किमीला ओळखणं कठीण झालं. किमीला ‘जुम्मा चुम्मा गर्ल’ म्हटलं जातं. आपल्या कारकीर्दीत यश मिळवून किमी काटकरनं बॉलिवूड कसं सोडलं ते जाणून घेऊया.

किमीनं 1985 च्या ‘पत्थर दिल’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर 1991 साली अमिताभ बच्चन यांच्या ‘हम’ चित्रपटाला चाहते विसरू शकत नाहीत. चित्रपटातील लोकप्रिय गाण्यात म्हणजेच ‘जुम्मा चुम्मा ..’ ची अभिनेत्री किमी काटकर विसरली जाऊ शकत नाही. या चित्रपटानं किमीला सुपरस्टार बनवलं. त्यामुळे तिचे चाहते तिला ‘जुम्मा जुम्मा गर्ल’ देखील म्हणतात.

‘अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टार्झन’ चित्रपटात किमीनं बोल्ड सीन देऊन चाहत्यांना चकित केलं होतं. या चित्रपटात किमीनं पडद्यावर अतिशय बोल्ड सीन दिले होते.

करीयरमध्ये किमीनं 80, 90 च्या दशकातल्या प्रत्येक मोठ्या कलाकाराबरोबर काम केलं. तिनं अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, संजय दत्त, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आणि मोठे हिट फिल्म्स दिले. गोविंदासोबत अभिनेत्रीची जोडीही खूप पसंतीस उतरली.

एक काळ असा होता किमीनं चित्रपटसृष्टीवर प्रश्न उपस्थित केले होते. बॉलिवूडमधील अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांवर जास्त लक्ष दिलं जातं, सिनेमात बराच भेदभाव केला जातो असंही तिनं म्हटलं होतं.

12 वर्षांच्या कारकीर्दीत किमीनं सुमारे 50 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तिनं सिनेमा सोडला आणि पुण्यातील फोटोग्राफर आणि अ‍ॅड फिल्ममेकर शांतनु शौरीशी लग्न केलं. या अभिनेत्रीला एक मुलगा देखील आहे आणि आता ती आपल्या कुटुंबासोबत उत्तम जीवन जगत आहे. काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.