इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशन लिमिटेडने (IRCTC) तुमच्यासाठी काही खास टुर पँकेजची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला मेघालय आणि कामाख्या देवीच्या दर्शनाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय इतर ही अनेक रोमहर्षक आणि किफायतशीर टूर पॅकेज आयआरसीटीसी घेऊन आले आहे. आसाम आणि मेघालय मधील नैसर्गिक सौंदर्य बघण्याची नामी संधी या पॅकेजमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
www.irctctourism.com या IRCTC च्या संकेतस्थळावर (website) जाऊन तुम्ही टूर पॅकेजसाठी बुकिंग करु शकता.
पॅकेजचे नाव – Mesmerizing Meghalaya with Kamakhya Darshan
डेस्टिनेशन – मव्ल्यनोंग, चेरापुंजी, शिलांग, गुवाहाटी
ट्रॅव्हलिंग मोड – फ्लाईट
फ्लाईट डिटेल्स – इंडिगो
फ्लाईट क्रमांक ः (6E-669/6344) 11.02.2022 रोजी इंडिगो एअरलाईंन्स सकाळी 9.05 वाजता उड्डाण करुन 4.40 वाजता पोहचेल.
परतीचा प्रवास ः फ्लाईट क्रमांक (6E-394/7264) 15.02.2022 रोजी इंडिगो एअरलाईन्स दुपारी 12.15 वाजता निघेल, रात्री 19.30 वाजता पोहचेल.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) त्यांच्या ट्विटर हँडलवरुन यासंबंधी ट्वीट करत टूर पॅकेजची माहिती दिली. त्यानुसार, मव्ल्यनोंग, चेरापुंजी, शिलांग, गुवाहाटी या टूर पॅकेजची माहिती त्यांनी दिली आहे. या संपूर्ण टूरची माहिती, त्याचा खर्च याचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आपण ही पूर्वांचल राज्यांना भेटण्यासाठी आणि तेथिल प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी इच्छुक असाल तर IRCTC च्या ट्विटर हँडलवर जाऊन आपण थेट माहिती घेऊ शकता. या ट्विटमध्ये एक लिंक शेअर करण्यात आली आहे. https://bit.ly/3GhesvZ या लिंकवर जाऊनही तुम्ही बुकिंग करु शकता. या टूरची, पॅकेजची आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांनी दिलेल्या 8287932242, 8287932329 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
मव्ल्यनोंग, चेरापुंजी, शिलांग, गुवाहाटी हा टूर 11 फेब्रुवारी 2022 रोजीपासून सुरु होईल. 15 फेब्रुवारी 2022 रोजी तो संपेल. या दरम्यान तुम्हाला कामाख्या देवीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) घोषीत केलेले हे टूर पॅकेज 4 रात्र आणि 5 दिवसांचे असेल. यामध्ये तुम्हाला मेघालय आणि कामाख्या देवीचे दर्शन घडेलच. सोबतच नोहकलिकाई फॉल्स, मौसमी केव्स, डौकी लेक, डॉन बॉस्को म्यूझियम, ब्रम्हपूत्र नदीसह अनेक ठिकाणे दाखविण्यात येणार आहे.