भारतीय लष्कराचे इंजिनियर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे.माहिती देताना ते म्हणाले की ही यंत्रणा स्फोट सहन करण्यास सक्षम आहेत आणि 36 ते 48 तासांत पुन्हा उभी केली जाऊ शकतात तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत देखील केली जाऊ शकते.
यासोबतच त्यांनी सांगितलं की, पूर्व लडाखमध्ये अशाच कायमस्वरूपी संरक्षणाची चाचणी घेण्यात आली आहे आणि ती उपयुक्त ठरली आहे.
लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी सोमवारी सांगितलं की भारतीय लष्कर स्वदेशी आधुनिकीकरणासाठी सज्ज आहे आणि संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचं महत्त्व अधोरेखित केले.
एएससी सेंटर अँड कॉलेज, बंगळुरू येथे ‘आर्मी डिझाईन ब्युरो’च्या (ADB) प्रादेशिक तंत्रज्ञान नोडच्या (RTN-B) उद्घाटन समारंभात लेफ्टनंट जनरल बी.एस. राजू यांनी ही माहिती दिली.