आज दि.८ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

तालिबानच्या सरकारबाबत
अमेरिकेला चिंता

संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे असा मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा आता तालिबानच्या या नव्या सरकारचा पंतप्रधान आहे. त्यामुळे समस्त जगच दहशतवाद्यांनी स्थापन केलेल्या या सरकारकडे काळजीने, शंकेने आणि भितीने पाहात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने तालिबान्यांच्या या सरकारबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मंदिराचा पुजारी मालक नव्हे
सेवक : सर्वोच्च न्यायालय

एक पुजारी कोणत्याही जमीन तसेच मंदिराचा मालक असू शकत नाही. तो फक्त सेवकासारखे काम करतो. मंदिरातील संपत्तीचा मालक त्याचे देवच असतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जमीन महसुलाच्या नोंदणीत पुजा-याची नावे जोडण्यासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे.

पाण्यासाठी लोक न्यायालयात,
येतात हे दुर्दैव : न्यायमूर्ती

नियमितपणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा मूलभूत अधिकार आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटल्यानंतर जर लोकांना लोकांना पाणी मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागत असतील तर हे दुर्दैवी आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कांबे गावातील रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. जे. काठवल्ला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली आहे.

रेल्वे लेट झाल्यास प्रवाशांना
प्रशासनाने द्यावी भरपाई

लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर होणं हे नित्याचंच झालं आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्याचबरोबर ठरलेलं नियोजन विस्कटतं. मात्र आता ट्रेनला ठराविक वेळेत ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वेची असणार आहे. यासाठी रेल्वेला प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे

भारतीय रेल्वे गणपती उत्सवासाठी
२६१ गाड्या चालवणार

गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे २६१ गणपती विशेष गाड्या विविध ठिकाणांसाठी चालवणार आहे. या गाड्यांसाठी विशेष तिकीट भाडे असणार आहे. गणपती विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वे २०१, पश्चिम रेल्वे ४२, कोकण रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) १८ गाड्या चालवणार आहे. या गाड्यांची सेवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाली असून त्या २० सप्टेंबर पर्यंत धावतील. तसेच, गर्दी कमी करण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या विविध गाड्यांमध्ये स्लीपर क्लासचे डबे वाढवले जाणार आहेत.

ई- पीक पाहणी मोबाईल अॕपला
शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई- पीक पाहणी मोबाईल अॕप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी मोबाईल अॕप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली असल्याची माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ
लवकरच खुले होणार

कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

वारकरी संप्रदायासाठी
दीर्घकालीन आराखडा

ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले-शाहू- आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.