‘अभियांत्रिकी प्रवेश 2022 नियम व प्रक्रिया ‘ वर मार्गदर्शन व चर्चासत्र संपन्न

नाशिकच्या के.के.वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन महाविद्यालयातर्फे आयोजन

जळगाव – शैक्षणिक वर्ष २०२२ साठी अभियांत्रिकी प्रवेश संदर्भातील नियम व प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन शहरातील व.वा.वाचनालयात करण्यात आले.नाशिकच्या के.के.वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॕ.प्रदीप जाधव , इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभागाचे प्रमुख डाॕ.रविंद्र मुंजे , सहाय्यक प्राध्यापक डाॕ.विलास पाटील , सहाय्यक प्राध्यापक जितेंद्र पाटील , सहाय्यक प्राध्यापक सुहास पंडीत यांनी विविध विषयांन्वये उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.
नाशिक येथील के.के. वाघ शिक्षण संस्था गेल्या ५० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देत आहे.के. के.वाघ शिक्षण संस्था संचलित के.के.वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालय नाशिक , हे AICTE, NBA , NAAC मान्यताप्रप्त असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नीत नाशिकमधील एकमेव स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
यावेळी उपस्थित पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे शंकाचे निरसन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.डाॕ.विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.सुहास पंडीत यांनी तर आभार प्रा.जितेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.