केवायसी 31 मेपर्यंत अपडेट करा अन्यथा SBI चे खाते गोठवणार

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे काम 31 मेपर्यंत करावे लागणार आहे. केवायसी 31 मेपर्यंत करा, अन्यथा बँकिंग सेवा बंद होऊ शकेल, असंही बँकेने म्हटलेय. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ न देता बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी 31 मे 2021 पर्यंत केवायसी अद्ययावत करणं आवश्यक आहे, असंही बँकेने स्पष्ट केलंय.

बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अधिसूचना जारी केली आहे. ग्राहक त्यांचे केवायसी कागदपत्रे त्यांच्या गृह शाखेत किंवा जवळच्या शाखेत सादर करू शकतात. कोरोनामुळे बँकेने ही सुविधा 31 मेपर्यंत वाढविली, म्हणजे आता ज्या खातेदारांचे केवायसी 31 मेपर्यंत अद्ययावत केले जाणार नाही, त्यांची खाती गोठविली जातील.

कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता एसबीआयने ग्राहकांना त्यांची कागदपत्र पोस्ट किंवा ईमेलद्वारे बँकेत पाठवून केवायसी अद्ययावत करण्याची परवानगी दिलीय. 31 मेपर्यंत अशी खाती गोठवू नयेत, असे बँकेने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना स्पष्ट सांगितलेय.
केवायसी अद्ययावत न केल्यामुळे आधीसुद्धा खाती गोठविली गेली होती, ती आता 31 मे पर्यंत फ्रीजच राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.