कोरोनाने लोकांना गुंतवणूक आणि बचतीवर लक्षकेंद्रीत करण्यास भाग पाडलं आहे. खर्च करण्यास कोणतीही मर्यादा नाही, परंतु कठीण काळात केवळ बचत करणंचं फायद्याचं ठरतं. वेळेत जी काही बचत केली जाते, ती कठीण काळात कामी येते. अनेकांना बचत, गुंतवणूक तर करायची असते, पण त्यातून अधिक रिटर्सही हवे असतात. अनेकांना कमी वेळेत, कमी पैशात अधिक रिटर्स हवे असतात. त्यामुळेच सध्या म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरंसीकडे अनेकांचा कल वाढला आहे. म्युच्युअल फंडमध्येच सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनही (SIP) येतो.
SIP म्युच्युअल फंडमधून मिळणारी खास स्किम आहे. ही अशी स्किम आहे, ज्यात दर महिन्याला काही हजार गुंतवणूक करुन लाखो किंवा कोटीमध्ये रिटर्न मिळू शकतात. एसआयपीअंतर्गत एखाद्या फंडमध्ये निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. 500 रुपयांपासून SIP मध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. गुंतवणुकदाराच्या बँक अकाउंटमधून दर महिन्याला एक निश्चित रक्कम कट होते, जी म्युच्युअल फंडमध्ये जाते.
एसआयपीमध्ये अधिक लाभ मिळवण्यासाठी एका मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. एसआयपीद्वारे तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होऊन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जातील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कमी रक्कमही यात टाकता येते. जेव्हा हवं तेव्हा काही अडचण असल्यास, एसआयपी मध्येच बंदही करता येते. यातील गुंतवणूक हवी तेव्हा कमी-जास्तही करता येते. रक्कम वाढवायची असल्यास, नवी एसआयपी सुरू करण्याची गरज लागत नाही. आहे त्याच एसआयपीमध्ये रक्कम वाढवता येते.
रिटर्न किंवा व्याज दराचा SIP चा कोणताही नियम असा नाही. हे पूर्णपणे शेअर बाजारावर अवलंबून आहे. शेअर बाजार चढा झाल्यास रिटर्न वाढतात आणि खाली उतरल्यास रिटर्न घटतात. परंतु एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये जमा राशीवर सुरक्षा प्रदान करते. एसआयपीमध्ये जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तसा वेळेसह तुमचा पैसाही वाढतो. स्टेट बँक आपल्या गुंतवणुकदारांसाठी खास संधी देते. SBI एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड स्किममध्ये गुंतवणूक केलेली छोटी रक्कमही कंपाउंडिंग पॉवरच्या सुविधेमुळे चांगले रिटर्स देऊ शकते.