सरकारने देशांतर्गत मार्गासाठी किमान आणि कमाल विमानभाडे मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ते भाडे 9.83 टक्क्यांवरून 12.82 टक्के करण्यात आले. कोरोना संकटामुळे अनेक महिन्यांपासून हवाई प्रवास बंद होता. लॉकडाऊननंतर 25 मे 2020 रोजी हवाई सेवा सुरू करण्यात आली आणि त्याच वेळी सरकारने लोअर आणि अप्पर मर्यादा निश्चित केली होती.
विमानसेवेच्या फायद्यासाठी आणि अप्पर मर्यादेच्या प्रवाशांना लक्षात ठेवून लोअर मर्यादा निश्चित करण्यात आली होती. नागरी उड्डयन मंत्रालयाने 12 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार नवीन हवाई भाडे 13 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
सरकारने देशांतर्गत हवाई मार्गाची सात वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली. विविध श्रेणींसाठी किमान आणि कमाल विमानभाडे निश्चित करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर, सरकारने 1 जून 2021 रोजी घरगुती विमानभाडे 15 टक्क्यांनी वाढवले, जरी कोविड पूर्व पातळीच्या तुलनेत उड्डाण क्षमता 80 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणली गेली.
देशातील अग्रगण्य विमान कंपनी स्पाईसजेटने गुरुवारी प्रवाशांसाठी नवीन घोषणा केली होती. स्पाईसजेटचे प्रवासी आता एअरलाईन्सच्या उड्डाणादरम्यान विमानतळावरुन बाहेर जाण्यासाठी टॅक्सी बुक करू शकतात. पहिल्या टप्प्यात 12 ऑगस्टपासून दिल्ली विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन सेवा उपलब्ध झालीय. ही सेवा मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि पुणे यासह सर्व प्रमुख विमानतळांवर टप्प्याटप्प्याने विस्तारित करण्यात येणार आहे. (फोटो क्रेडिट गुगल)