हिंदू धर्मात दरवर्षी श्राद्ध पक्ष (पितृपक्ष) साजरा केला जातो. या दरम्यान दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी पिंडदान वैगेर वेगवेगळे उपाय केले जातात. पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असते. दुसरीकडे, भाद्रपद महिन्यातील कृष्ण तिथीला गजलक्ष्मी व्रत केले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याम सांगतात की, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला महालक्ष्मी व्रत असते. हे व्रत 16 दिवस चालते आणि 16 व्या दिवशी म्हणजे कृष्ण पक्षातील अष्टमी गजलक्ष्मी व्रत म्हणून साजरी केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी हत्तीवर विराजमान असते. या काळात लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. जाणून घेऊया गजलक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व.
सोने खरेदी करणे चांगले –
हिंदू धर्मात, देवी लक्ष्मीची पूजा संपत्ती आणि समृद्धीसाठी केली जाते. माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे. असे मानले जाते की, जर कोणी देवी लक्ष्मीची खऱ्या भक्तीने पूजा केली तर ती रंकालाही राजा बनवते. गजलक्ष्मी व्रतामध्ये सोने खरेदी करणे खूप शुभ असते. असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केलेले सोने आठ पटीने वाढते.
यावेळी 17 सप्टेंबर रोजी गजलक्ष्मी व्रत होत आहे. गजलक्ष्मी व्रताव्यतिरिक्त याला महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात. अनेक ठिकाणी लक्ष्मीपर्व देखील 16 दिवस साजरे केले जाते आणि 16 दिवस कुटुंब लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करून 17 व्या दिवशी उद्यानपर्व करतात.
गजलक्ष्मी व्रताचे महत्त्व –
गजलक्ष्मी व्रताच्या वेळी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. या व्रतामध्ये रात्री चंद्राला अर्घ्य दिले जाते. जे लोक या दिवशी उपवास करतात ते अन्न घेत नाहीत. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो. महालक्ष्मी व्रत ठेवल्याने धन, अन्नधान्य, सुख, समृद्धी, संतती इ. गोष्टींची भरभराट होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. sdnewsonline त्याची हमी देत नाही.)