बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक, विकी कौशल आणि कतरिना कैफ होय. जोडप्याने डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोघांना अनेकदा कार्यक्रमांत एकत्र पाहण्यात आलं आहे. परंतु आता या जोडप्याचे चाहते त्यांना पडद्यावर एकत्र पाहण्याची वाट पाहात आहेत. कतरिना-विकीचे चाहते या दोघांना एकत्र चित्रपटात किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता काही प्रमाणात संपली आहे. दोघे लवकरच एकत्र दिसणार आहेत.
कतरिना कैफ आणि विकी कौशल पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. परंतु दोघे कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर एका जाहिरातीच्या शूटसाठी एकत्र आले आहेत. कतरिना आणि विकी एका ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीत दिसणार आहेत आणि त्याचा पहिला लुक आता समोर आला आहे.सोबतच कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच एखाद्या चित्रपटातसुद्धा दिसतील अशा अपेक्षा चाहत्यां कडून व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी वेगवेगळे कपडे घालून कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहेत. काही फोटोंमध्ये ते हॉलिडे वेअर तर काही कॅज्युअल वेअरमध्ये प्रमोट करताना दिसत आहे. या जोडप्याच्या चाहत्यांना हा फोटो प्रचंड पसंत पडला आहे. एका फोटोमध्ये विकी कतरिनाचं कौतुक करताना दिसत आहे. तर कतरिना लाजताना दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुपचूप लग्न केलं होतं. राजस्थानमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नापूर्वी दोघांनी कधीही आपल्या प्रेमाचा किंवा नात्याचा खुलासा केलेला नव्हता. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच मीडियाला याबाबत अंदाज आला होता. राजस्थानला रवाना होण्यापूर्वी विकी कौशल कतरिनाच्या अपार्टमेंटच्या बाहेर दिसून आला होता. त्यानंतर एयरपोर्टवर जाताना कतरिनाची सर्व फॅमिली कॅमेऱ्यात कैद झाली होती. या दोघांनी लग्नानंतर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली होती.