सर्वांवर कारवाईचा बडगा
सोलापुरातील मौलाना आझाद पॉलिटेक्निकल कॉलेजमधील 319 विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाच्या पेपरमध्ये कॉपी केल्याचा ठपका ठेवून संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एमएसबीटी अंतर्गत पॉलिटेक्निकल शाखेच्या होणाऱ्या परीक्षा मौलाना आझाद संस्थेतील 319 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली म्हणून डीबार केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याच्या सूचना एमएसबीटीने मौलाना आझाद संस्थेला दिली आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे पवित्रा घेतला आहे. सोलापूर प्रहार संघटनेकडून एमएसबीटीने कॉफीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे, असा आरोप केला आहे. यातून आता विद्यार्थ्यांवर वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
मौलाना आझाद पॉलिटेक्निकल कॉलेज समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला प्रहार संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. बुधवारी एमएसबीटी संस्थेवर प्रहार संघटनेकडून 319 विद्यार्थ्यांना घेऊन भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना घेऊन मोर्चा नेणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे.
एमएसबीटी अंतर्गत पॉलिटेक्निकल कॉलेजमधील सर्व डिप्लोमा शाखेची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र सामूहिकरित्या कॉपी केल्याचा ठपका ठेवून मौलाना आझाद संस्थेतील 319 विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलंय. सर्व विद्यार्थ्यांना डिबारही करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.