राज्याचे उपमुख्यमंत्री दर शुक्रवारी पुण्याती कोरोना स्थितीचा आढावा घेतात. सोमवारपासून कॉलेज सुरू करण्याची परवानगी दिली आहे. विद्यार्थ्यांचे दोन कोरोना डोस पूर्ण झालेले असणं आवश्यक आहे. पुण्याबाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणं आवश्यक आहे, असं अजित पवार म्हणाले.
सोमवारपासून खाजगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत, असं अजित पवार म्हणाले. मात्र नियमाचे पालन करूनचं ही परवानगी असेल. सोमवारपासून कॉलेज सुरू करण्याची परवानगी देत आहोत. शिक्षकांचे कोरोना लसीचे दोन डोस झालेले असणं बंधनकारक आहेच त्याशिवाय विद्यार्थ्यांचे देखील दोन डोस झालेले असणं आवश्यक आहे. पुण्याबाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.
22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरू करणार आहोत. सोमवारपासून राज्य आणि केंद्र सरकारशी संबधित ट्रेंनिग सेंटर सुरू करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. कोरोना लसीकरणात राज्यात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, असं अजित पवार म्हणाले.
झोपडपट्टी परिसरात लसीकरण वाढवण्याच्या सूचना पवारांनी दिल्या. झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्याचा कोरोना दर 2.5 दर आहे. बाधित दर 3 टक्के आला आहे. पहिला डोस घेण्यार्यांचे प्रमाण 103 टक्के आहे. पिंपरी चिंचवड मध्ये लसीकरणाचा वाढवण्याची गरज आहे. जिल्ह्याने एक कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे.
आयकर धाडीवर मी काल बोललो आहे, चौकशी सुरू आहे. ते त्यांचं काम करतायत, ते पूर्ण झाल्यावर मी बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले.जिथे ते गेलेत तिथे तिथे त्यांनी मुक्काम केला आहे. आज पण त्यांचं काम चाललेलं होतं. काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते बघत आहेत. आयटी विभाग त्यांचं काम करुन गेल्यानंतर मी बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले.