पुणे शहरात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. शहरातील दैनंदिन स्वरुपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा मिळणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश लागू असेल.
पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करु शकतील. पीएमपीएलएम बससेवा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. तर बँका आणि सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांचे काम आठवडाभर सुरु राहणार आहे. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठीदेखील हे आदेश लागू असतील. शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू असणार आहेत. शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहेत.
या गोष्टी सुरु राहणार
- हॉटेल, रेस्टॉरंट – ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने
- हॉटेल – शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा
- लोकल – फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी
- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत
- खासगी कार्यालये – ( सोमवार ते शनिवार ) दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता)
- क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात
- चित्रीकरण – बायोबबल , सायंकाळी 5 पर्यंत
- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत
- लग्न समारंभ – 50 जणांच्या उपस्थितीत
- अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत
- शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती
- बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा
- शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत (Pune City Unlock Guidelines)
- संचारबंदी – शहरात सायंकाळी पाचनंतर
- जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन
- सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून
- ई कॉमर्स – नियमित वेळेत
- माल वाहतूक – नियमित वेळेत