लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी आता केंद्राची असणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी २ मोठ्या घोषणा केल्या.

पहिली मोठी घोषणा म्हणजे, लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी आता केंद्राची असणार आहे. केंद्र सरकारने राज्यांची 25 टक्के जबाबदारी काढून घेतली आहे. २१ जूननंतर १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. ७५ टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करून मोफत देणार आहे. 25 टक्के लसी खासगी हॉस्पिटल्सना दिले जाणार आहे.

दुसरी मोठी घोषणा म्हणजे, पीएम गरीब कल्याण योजनेला दिवाळीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य मिळणार आहे. पंतप्रधानांच्या या घोषणा सर्वसामन्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या लोकांसाठी पंतप्रधांनाची ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या योजनेत जाहीर करण्यात आलेले अतिरिक्त ५ किलो मोफत अन्नधान्य दरमहा रेशनकार्डवर उपलब्ध असलेल्या रेशनव्यतिरिक्त मिळणार आहे. जर एखाद्या कुटूंबाच्या रेशनकार्डमध्ये ४ सदस्य असतील आणि सध्या प्रत्येक सदस्याला ५ किलो रेशन (तांदूळ/ गहू) मिळत होते. पण आता या योजनेअंतर्गतअतिरिक्त ५ किलो धान्य पकडून एकूण १० किलो धान्य महिन्याला मिळणार आहे.

मागच्या वर्षी कोविड-19 च्या पहिल्या लाटेदरम्यान ही योजना लागू केली गेली होती. जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला गेला होता. ही येाजना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज चा भाग आहे. यामध्ये प्रति व्यक्ती ५ किलो धान्य आणि प्रति कुटुंब १ किलो डाळ मोफत दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.