सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घट

आठवड्यातील पहिल्याच दिवशी सलग दुसऱ्यांदा सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घट झाली आहे. डॉलरमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच (MCX) नुसार सोन्याच्या दरात प्रति 10 ग्राममागे 0.08 इतकी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 0.3 घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याच्या किंमतीत 0.2 टक्के घट झाली आहे. डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार सोमवारी MCX वर ऑगस्ट वायदा सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅमचा (Gold Price) दर हा 48 हजार 953 रुपये इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.2 ने घसरण झाल्याने नवे दर हे 1,886.76 डॉलर प्रति औस इतके झाले आहेत.

एमसीएक्सवर जून वायदा (Silver Price) चांदीच्या दरात घट होत नवा दर हा 71 हजार 308 प्रति किलो इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात घसरण झाल्याने नवे दर हे 27.58 डॉलर प्रति औस इतके झाले आहेत.

बँक ऑफ अमेरिका सिक्योरिटीजच्या अंदाजानुसार, 2021 शेवटपर्यंत ग्लोबल लेवलचा स्तर हा 2 हजार 63 डॉलर प्रति औस इतका असू शकतो. एक औस सोनं म्हणजे 28.34 ग्राम सोनं होयं. यानुसार एक ग्रॅम सोन्याची किंमत ही 5 हजार 307 रुपये इतकी आहे.

यानुसार, सोनं लवकरच प्रति तोळा 53 हजार पार जाऊ शकतो. कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या मंदीत संधी साधत अनेकांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लवकरच सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.