केएस भरतने पदार्पणातच दाखवली चुणूक, कसोटीतील टॉप फलंदाजाला केलं बाद

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारताचा टी२० मधील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक केएस भरत यांनी कसोटीत पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात निराशाजनक राहिली. २ धावात दोन गडी बाद झाले होते. त्यांचा पहिला डाव १७७ धावात संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला पायचित केलं. पंचांनी ख्वाजाला बाद दिलं नाही. यानंतर केएस भरतसोबत बोलल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने डीआरएस घेतला. तेव्हा रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पवर लागत असल्याचं दिसलं. ख्वाजा फक्त एका धावेवर बाद झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नरसुद्धा एक धाव करून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाचे दोन गडी बाद झाल्यानंतर मार्नस लॅब्युशेन आणि स्टिव्ह स्मिथने तिसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागिदारी केली. मात्र रविंद्र जडेजाच्या चेंडूवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात लॅब्युशेन यष्टीचित झाला. तो पुढे आल्यानंतर क्रीजमध्ये परत जाण्याआधीच केएस भरतने चपळाई दाखवत यष्टीचित केलं होतं. लॅब्युशेनने १२३ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. यात त्याने ८ चौकार मारले. लॅब्युशेन कसोटीतला नंबर एकचा फलंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.