पुण्यातील लोहगाव विमानतळ 14 दिवस बंद राहणार

लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 14 दिवस बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता मुंबई विमानतळावर अवलंबून राहावं लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेण्यात आलं आहे. 26 ऑक्टोबरपासून या कामाचा महत्वाचा टप्पा सुरु झाला होता. तेव्हापासून लोहगाव विमानतळावरुन रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागील वर्षभर या विमानतळावरुन फक्त दिवसाच उड्डाणं होत होती. मात्र आता 16 ऑक्टोबरपासून 16 दिवस तिही बंद होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरुन प्रवासी उड्डाणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यात 2 ऑक्टोबरला पुण्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तशी माहितीच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी त्यावेळी दिली. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती बापट यांनी दिलीय. तसंच आपण एक पत्र नितीन गडकरी यांना दिल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.