तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. पाठकबाई म्हणून चाहते अद्याप तिला भरभरुन प्रेम देत आहेत. सध्या अक्षय स्मॉल स्क्रिनपासून जरी लांब असली तरी तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओज कमालीचे व्हायरल होताना दिसतात. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला आहे.
राणादा आणि अंजलीबाई ही जोडी अद्याप प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अक्षयाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अनेक ब्रॅण्डसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट केलं आहे.
एवढंच नव्हे ,तर काही दिवसांपूर्वीच अक्षयाने एक गाण्याचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. ज्याला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.आता पाठकबाई पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत ते त्यांच्या पारंपारिक लूकमधील फोटोंमुळे.
अक्षयाने नुकतच पारंपारिक साजश्रृंगार करत फोटोशूट केलं आहे. या फोटोशूट दरम्यान तयार करण्यात आलेला व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.
अक्षयाने या व्हिडिओत निळ्या आणि गुलाबी रंगाची डिझाईनर लेहंगा घातला आहे. त्यावर शोभून दिसेल अशी गोल्डन ज्वेलरी देखील परिधान केले आहेत. त्यात अक्षयाच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सगळ्याचं लक्षवेधून घेतलं आहे. याआधी शिवजयंतीच्या मुहूर्तावर अक्षयाने केलेला राजेशाही लूक देखील खूपच चर्चेत आला होता.