मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर आमदारांच मनपरिवर्तन होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
सुप्रीम कोर्टात याचिका
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय कोंडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट पाहता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पक्षांतरविरोधी कायद्याला बगल देऊन राजकीय पक्ष सरकार कसे पाडत आहेत, असे या याचिकेत सांगण्यात आले. विधानसभेचा राजीनामा देणाऱ्या आमदारांना पोटनिवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळते, तसेच ते नव्या सरकारमध्ये मंत्रीही होतात.