बंडखोर एकनाथ शिंदे याच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदार नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. शिवसेनेचे आणखी सहा आमदारांसोबत शिवसेनेचा संपर्क होत नाही. सध्या गुवाहाटीमध्ये जवळपास 45 आमदार उपस्थित आहेत. त्यात आता आणखी आमदार संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील दोन आमदार नॉटरिचेबल आहेत.
सध्या मंत्री दादा भुसे, संजय राठोड, आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर आणि दिलीप लांडे यांच्याशी संपर्क होत नाही. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या नेत्यांनी बंडाचं निशाण उगारल्याने नेमकी नाराजी काय आहे. एकप्रकारे पक्ष नेतृत्वावर आमदारांची नाराजी असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सध्या सर्व बंडखोर सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था ही गुवाहाटीमधील ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये शिवसेनेचे 45 पेक्षा जास्त आमदार आहेत. यामध्ये गुलाबराव पाटील हे देखील आहेत. गुलाबराव हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.