कल्याण-डोंबिवलीतही म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत 43 रुग्ण आढळले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण या आजारावर उपचार घेत आहेत.
म्यूकरमायकोसिस आजारामुळे आतार्पयत 8 जणांचा मृत्यू आला आहे. आतार्पयत या आजाराचे 43 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 18 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या 11 रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांनी दिली आहे. या रुग्णावर उपचार करण्यासाठी त्यांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार मिळावेत असा प्रस्ताव महापालिकेच्यावतीने राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, कंत्रादारामार्फत या आजारावरील 100 इंजेक्शन्स मागवण्यात आली होती. मात्र, या आजारावर पालिका रुग्णालयात उपचार करण्यात येत नसल्याने इंजेक्शन्सचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना या आजारावरील इंजेक्शन हवे असल्यास ही इंजेक्शन्स सिव्हिल सर्जनकडे उपलब्ध आहेत. सरकारच्या संकेतस्थळावरून त्याची नोंदणी करून इंजेक्शन्स मागवता येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यात गेल्या चोवीस तासात 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात चोवीस तासात 14,123 नवीन रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोन रुग्णांची संख्या 57,61,015वर गेली आहे. सध्या राज्यात 2,30,681 सक्रिय रुग्ण आहेत.