नासाची मंगळ ग्रहावर संशोधन मोहीम सुरु आहे. मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचं संशोधन करणाऱ्या नासाचा रोवर महत्वाची माहिती नासाकडे पाठवत आहे. नासाच्या रोव्हरकडून मंगळ ग्रहावरील छायचित्र पाठवली जातात. मगंळ ग्रहावरील डायनासोरच्या आकारातील दगडाचा फोटो नुकताच नासामध्ये काम करणाऱ्या केविन गिल यांनी शेअर केला आहे. केविन गिल यांच्यासह जेसोन मेजर यांनी देखील काही फोटो शेअर केले आहेत.
केविन गिल हे नासामध्ये कार्यरत आहेत. नासाच्या मंगळ ग्रहावरील अँडव्हान्स प्रीझर्व्हन्स रोवरनं मगंळ ग्रहावरील पाठवेला फोटो ट्विटरला शेअर केला आहे. हा फोटो रोव्हरनं 15 एप्रिलला नासाकडे पाठवला. केविन गिल यांनी हा फोटो शेअर करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. मंगळ ग्रहावरील या दगड छोट्या आकाराच्या डायनासोर सारखा दिसत आहे.
नासाला मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले
नासाला मंगळ ग्रहावर पाणी उपलब्ध असल्याच पुरावे मिळाले आहेत. नासाला प्राप्त झालेल्या पुराव्यांनुसार मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. मंगळ ग्रहाच्या ओबड धोबड जमिनीवर फिरणाऱ्या रोवरच्या पाहणीतून आढळेल्या दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचं संकेत मिळतात. Chemcam उपकरण आणि टेलिस्कोपद्वारे सेडिमेंटरीच्या तळाचा अभ्यास केला गेला.
जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची शक्यता
मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळत आहेत. ओली माती दिसून आली. त्याप्रमाण दमट वातावरण असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरलं असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे. नासाच्या रोवरला संपर्ण माहिती घ्यायची आहे. त्यानंतरच मंगळावरील बदलणाऱ्या वातावरणाची माहिती मिळणार आहे.