शांती, समाधानासाठी जगाला भारताकडून आशा – मोहन भागवत
शांती, समाधान यासाठी जग भारताकडे आशेने पाहत आहे. भविष्यात भारत महासत्ता असेल, मात्र महासत्ता बनणार नाही. वसुधैव कुटुंबकम ही आपली मूळ विचारधारा आहे. हा भगवद्गीतेतील विचार असून लोकमान्यांनी या विचारधारेप्रमाणे जीवन व्यतित केले. हीच विचारधारा कायम ठेवत आपणाला जायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी सांगलीत केले. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त डॉ. भागवत यांचे जाहीर व्याख्यान चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
“आधीच माकड आणि त्यात बेवडा…”, भुजबळांची मनोज जरांगेंवर बोचरी टीका
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. शिवाय २४ डिसेंबरच्या आधीच सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा, त्यानंतर एक तासही वाढवून देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते भिवंडी येथील ओबीसी मेळाव्यात बोलत होते.रविवारी (१७ डिसेंबर) भिवंडी येथे पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. भुजबळांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांची तुलना मद्यपींशी केली. आधीच माकड त्यात बेवडा प्यायलेला, अशा अर्थाच्या म्हणीचा वापर करत भुजबळांनी टीकास्र सोडलं.
तीन राज्यांत भाजपानं मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्यांना संधी का दिली?
नुकतेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या तिन्ही राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी दिग्गज नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे.‘जागरण’ या हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या देशाचं दुर्दैव आहे की, जे लोक आपल्या भाषणातून बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्वातून समाजजीवनावर प्रभाव पाडतात, त्यांच्यातील एक मोठा वर्ग जुन्या आणि बंदिस्त मानसिकतेत अडकला आहे. हे फक्त राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. ही प्रवृत्ती सार्वत्रिक जीवनात सगळीकडे आपल्याला त्रास देत असते.”
“जसे कुठल्याही क्षेत्रात एखादं नाव मोठं झालं, कुणीतरी आपली जाहिरात केली तर बाकीच्या लोकांवर लक्ष जात नाही. मग, तो व्यक्ती कितीही प्रभावशाली असो किंवा चांगलं काम करत असू. तेच, राजकीय क्षेत्रातही होत असतं. दुर्दैवाने अनेक दशकांपासून माध्यमांचं लक्ष काही कुटुंबावरच अधिक राहिलं आहे,” असं मोदींनी सांगितलं.
‘बेरोजगार आहात तर लोकसभेत उड्या मारणार का?’, संसदेतील घुसखोरी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य
नुकतेच संसदेत घुसखोरी करण्याचे प्रकरण घडले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या तरुणांनी हे कृत्य केले. राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेबाबत नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले, “राहुल गांधी यांच्याकडे आता बोलण्यासाठी कोणताही विषय नाही. बेरोजगार आहे म्हणून आता सर्वांनी लोकसभेत येऊन उड्या मारायच्या का? लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचे इतरही पर्याय आहेत. आपले प्रश्न मांडण्यासाठी इतरही विधायक मार्ग आहेत. त्याचा अवलंब न करता थेट लोकसभेत येऊन उड्या मारणे योग्य नाही.” एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले.
राम मंदिर उदघाटनाआधी अमेरिकेत जल्लोष; हिंदूंनी काढली भव्य रॅली
अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन केले जाणार आहे. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष आतापासूनच साजरा केला जात आहे. नुकतेच अमेरिकेमधील वॉशिंग्टन डीसी येथील मेरीलँडच्या श्री भक्त आंजनेय मंदिराजवळ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने चारचाकी आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक हिंदू भाविक या रॅलीत सहभागी झालेले पाहायला मिळाले.मंदिराजवळ असलेल्या ‘अयोध्या मार्ग’ (Ayodhya Way) या रस्त्यावरून वाहन आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अमेरिकन हिंदू समाजातील अनेक लोक रॅलीसाठी जमले होते. लहानथोरांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांचा यात सरभाग होता. अमेरिकेच्या इतर राज्यातूनही काही हिंदू भाविक या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात येते.
उसापासून इथेनॉलनिर्मितीस अखेर मंजुरी; केंद्राचा निर्णय, १७ लाख टन साखरेची मर्यादा
यंदाच्या इथेनॉल पुरवठा वर्षांत (नोव्हेंबर २०२३-ऑक्टोबर २०२४) कमाल १७ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यास केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. गेल्या हंगामात ३८ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली गेली होती. यंदा निर्बंध नसते तर ४५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाण्याचा अंदाज होता.संभाव्य साखरटंचाई लक्षात घेऊन केंद्राने ७ डिसेंबर रोजी उसाचा रस आणि सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन करण्यास या हंगामासाठी बंदी घातली होती. त्यामुळे साखर उद्योग क्षेत्रात नाराजी व्यक्त होत होती. शुक्रवारी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने काढलेल्या नव्या परिपत्रकात, निर्बंध शिथिल करून १७ लाख टन साखर बनू शकेल एवढा उसाचा रस किंवा सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन होईल, तसेच बी हेवी मोलॅसिसपासूनही अतिरिक्त इथेनॉल उत्पादन घेता येईल असे नमूद करण्यात आले आहे.
टीम इंडियाच्या शानदार विजयावर कर्णधार केएल राहुलची प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ८ गडी राखून जिंकला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने आपल्या दोन वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले आहे. त्याने सामन्यानंतर सांगितले की, स्पिनर्सचा लवकर वापर करण्याची आपली रणनीती होती, परंतु येथे फक्त वेगवान गोलंदाज पुरेसे ठरले.साामन्यातील विजयानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला, ‘गेल्या वेळी मी येथे कर्णधार म्हणून तिन्ही वनडे सामने गमावले होते. आज दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याविरुद्ध सामना जिंकून छान वाटत आहे. या सामन्यात लवकरच गोलंदाजीसाठी फिरकीपटूंचा वापर करण्याची योजना होती, पण सुरुवातीला खेळपट्टीत चांगली हालचाल होती आणि आमच्या वेगवान गोलंदाजांनी त्याचा फायदा घेतला आणि चांगली कामगिरी केली.”
कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अव्वल, पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला झाला फायदा
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव केला. कांगारूंच्या या विजयाचा भारतीय संघाला फायदा झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. दोघांचे गुण आणि टक्केवारी जरी समान असली तरी टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या एक स्थान वर पहिल्या क्रमांकावर आहे.दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. सध्याची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ आवृत्तीचा भाग आहे. त्याचा अंतिम सामना २०२५मध्ये खेळवला जाईल. गुणांच्या टक्केवारीनुसार अव्वल दोन क्रमांकाचे संघ अंतिम फेरीत खेळतील. मात्र, हे अद्याप प्रारंभिक टप्पे आहेत आणि भविष्यात बरेच बदल दिसून येतील.
SD Social Media
9850603590