दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 50 हजारांच्या पातळीवर

रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ (Gold Price) होताना दिसत आहे. आरबीआयच्या घोषणेनंतरही शेअर बाजारामध्ये आज सुस्तपणा आहे. रुपया 7 पैशांच्या वाढीसह 73.84च्या पातळीवर व्यापार करत आहे. सकाळी 11 वाजता एमसीएक्सवर, जून डिलिव्हरीचे सोने 176 रुपयांनी वाढून 47176 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि ऑगस्ट डिलिव्हरीचे सोने 170 रुपयांनी वाढून 47500 रुपयांवर पोहोचले आहे. या दिवाळीपर्यंत एमसीएक्सवरील सोन्याचा दर 50 हजारांच्या पातळीवर जाईल, असे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे .

एमसीएक्सवरही चांदीचे भावही वाढताना दिसत आहे. जुलै डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 335 रुपयांनी वाढून 69954 रुपये प्रतिकिलो झाला होता. सप्टेंबरच्या चांदीचा भाव 429 रुपयांनी वाढून 71027 रुपये प्रतिकिलो राहिला. बुधवारी (5 मे) दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति दहा ग्राम पातळीवर 317 रुपयांनी घसरून 46,382 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीची किंमत 2328 रुपयांनी वाढून 70270 रुपये प्रतिकिलो पातळीवर पोहोचली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचा दर

आयबीजेए (IBJA) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 5 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 46753 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदी 68835 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती वाढत आहेत. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवर सकाळी 11.20 वाजता उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जून डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 7 डॉलरने वाढून 1719 डॉलर प्रति औंस व चांदीचा भाव 0.26 डॉलरने वाढून 26.78 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता.

डॉलर निर्देशांक -0.023 ने घसरत 91.270 वर आला. हा निर्देशांक जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद आणि कमजोरी दर्शवतो. 10 वर्षांसाठी यूएस बाँडचे उत्पन्न सध्या 1.577 टक्क्यांनी घसरत आहे. जेव्हा उत्पादनावर दबाव वाढतो तेव्हा सोन्याची चमक वाढते. या दिवाळीपर्यंत एमसीएक्सवरील सोन्याचा दर 50 हजारांच्या पातळीवर जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत 4 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याला पाठिंबा मिळालाय. या महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकन बॉन्ड यील्डच्या सोन्याच्या भावात वाढ झाली असून, सेप-हेवन मालमत्तेला धक्का बसलाय. परंतु अमेरिकी बाँडच्या उत्पन्नातील कमकुवतपणा आणि अमेरिकन डॉलरच्या नरमपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.