भारतातील ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाची 94 व्या अकॅडमी अवॉर्डस् साठी नॉमिनेशन मिळाले आहे. ही भारतासाठी (India) मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. द पावर ऑफ द गॉडला सगळ्यात जास्त कॅटेगॅरीमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. जगातील सगळ्यात प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या अकॅडमी अवॉर्ड म्हणजे सगळ्या चित्रपटकर्मींसाठी ती प्रतिष्ठेची बाब असते. या वर्षीही अनेक मोठे चित्रपट या पुरस्कार सोहळ्यात विजयाचे दावेदार होते. आणि यावर्षी सगळ्यात जास्त भारतीय प्रेषकांनी या पुरस्कार सोहळ्याकडून अपेक्षा आहेत, कारण ऑस्कर पुरस्काराच्या यादीत काही भारतीय चित्रपटांनी जागा मिळवली आहे.
नॉमिनेशच्या यादीतही भारतीय चित्रपटांची नावं आहेत. यावर्षी भारतातर्फे सूर्याची जय भीम आणि मोहनलालची मराक्कर हा चित्रपटचाही समावेश होता, मात्र पुरस्कारावर याची मोहोर उमटू शकली नाही. चित्रपटाच्या या गर्दीत मात्र माहितीपटाच्या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाने सगळ्याना आश्चर्यचकित करून टाकले, कारण या माहितीपटाने आपली जागा पक्की केली आहे. 94 व्या अकॅडमी अवॉर्ड सोहळा चालू असून तो त्यांच्या यूट्यूब आणि ABC वरून सुरू आहे.
भारताकडून गेलेला माहितीपट ‘रायटिंग विथ फायर’ ला 94 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी नॉमिनेशन मिळाले आहे. ही भारतीय प्रेषकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हा माहितीपट रिंटू थॉंमस आणि सुष्मित घोष या दोघांनी मिळून दिग्दर्शित केली आहे. याबरोबरच आणखी चार माहितीपटांची निवडही झाली आहे. ज्यामध्ये एटिकी आणि फ्ली यांचाही समावेश आहे. बेस्ट फिचर फिल्मसाठी जपान, डेनमार्क, इटली, भूतान आणि नॉर्वे देशातील चित्रपटांचा समावेश आहे.