शाहरुख खान याचे वडील ताज मोहम्मद खान यांनी नाकारला होता ‘मुगल-ए-आजम’

भारतीय चित्रपट सृष्टीत असे अनेक चित्रपट बनवले गेले, ज्याने केवळ इतिहासच रचला नाही, तर आपल्या मनावर आणि समजावरही छाप पाडली. अशाच चित्रपटांपैकी एक होता दिवंगत चित्रपट निर्माते के.के. आसिफ यांचा ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट. हा चित्रपट 1960मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी बरीच वर्षे लागली होती. या दरम्यान या चित्रपटात अनेक कलाकारांचा सहभाग झाला होता, त्यामुळे अनेकांना नकार देखील देण्यात आला. त्यापैकीच, एक नावं होतं शाहरुख खान याचे वडील ताज मोहम्मद खान.

प्रख्यात लेखक राजकुमार केसवानी, जरी आता लोकांमध्ये नसले तरी आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कथा, किस्से प्रेक्षकांशी शेअर केले आहेत. यातील एक गोष्ट म्हणजे शाहरुख खानचे वडील ताज मोहम्मद खान यांच्याबद्दलही होती, ही त्यांच्या ‘मुगल-ए-आजम’ या पुस्तकातही वाचायला मिळते. शाहरुख खानचा हवाला देत त्यांनी ही घटना लिहिली आहे.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या वडिलांना ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटात राजा मान सिंहची भूमिका साकारण्याची ऑफर देण्यात आली होती. शाहरुखचे वडील व्यवसायाने वकील असल्याने त्यांना अभिनयाची आवड नव्हती, म्हणून त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला. बॉलिवूडच्या कॉरिडोरमध्ये बरीच वर्षे ही कहाणी चर्चिली जात होती.

आता या किस्स्याचा दुसरा पैलू आणि जे सत्य म्हणूनही मानले जाऊ शकते, जो ताज मोहम्मदचा मुलगा शाहरुख खान यांच्या हवाल्याने लिहिला आहे. राजकुमार केसवानी यांच्या मुगल-ए-आजम या पुस्तकात शाहरुख खानच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील ताज मोहम्मद खान हेही त्या चित्रपटासाठी ऑडीशन देणाऱ्यांपैकी एक होते ज्यांना मुगल-ए-आजममध्ये भूमिका मिळवायची इच्छा होती, परंतु ते के. आसिफच्या परीक्षेत यशस्वी ठरले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.