ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा आज वाढदिवस

जन्म. १४ जून १९५६

मराठी चित्रपटांमधील चरित्र व्यक्तिरेखांमध्ये भरपूर प्रयोग करणारा अभिनेता म्हणून सुनील तावडे यांच्याकडे पाहिले जाते. ४३ हून अधिक वर्षे या क्षेत्रात काम करताना सुनील तावडे यांनी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या कठीण भूमिका खूप सहजतेने साकारल्या आहेत. सुनील तावडे यांच्या नाट्यक्षेत्रातील मार्गदर्शक विजया मेहता होत. त्यांच्या दिग्दर्शनात त्यांनी ‘बॅरिस्टर’ हे नाटक केलं. आपल्या करीयरची सुरुवात त्यांनी १९७० साली ‘नटसम्राट’ या नाटकाने केली.‘नवरा माझा नवसाचा’ मधील भूमिकेमुळे सुनील तावडे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘दुहेरी’ या मालिकेत काही काळ ते नर्सच्या रुपात दिसले होते. ‘माझा होशील ना’ ही सध्या त्यांची मालिका गाजत आहे. ‘नटसम्राट’,’बॅरिस्टर’ तरुण तुर्क म्हातारे अर्क,लग्नाची गोष्ट, एकदा पहावे करून, लेकुरे उदंड झाली ही त्यांची काही नाटके होत. तर ‘एक फुल चार हाफ’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘गोलमाल’, ‘शुभमंगल सावधान’, ‘जबदस्त’, ‘फुल थ्री धमाल’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ हे सुनील तावडे यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. सुनील तावडे यांचे चिरंजीव शुभंकर हा पण अभिनेता असून मकरंद माने दिग्दर्शित ‘कागर ‘ या चित्रपटात त्याने भूमिका केली आहे. रिंकू राजगुरुची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका होती. या आधी शुभंकरने अनेक एकांकिकांमध्ये काम केले आहे. ‘डबल सीट’ चित्रपटात तो झळकला होता. तसेच अजून एका मालिकेतही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर त्यांची मुलगी गौरी तावडे अनेक मालिकांची असोसिएट डायरेक्टर आहे. तसेच आता एका चित्रपटासाठी ती असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत आहे. तिला कॅमेऱ्याच्या पुढे नव्हे तर मागे राहायला आवडते. तिला कलाकार निर्माण करायला आवडतात असे ती सांगते.

संजीव वेलणकर पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.