हल्ली अन्न साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फ्रिजिंगचा पर्याय वापरला जातो. . हा एक सोपा पर्याय समजला जातो. घाईघाईत अनेक लोक गोठवलेले किंवा फ्रिज केलेले पदार्थ गरम करून खातात आणि कामावर निघून जातात. परंतु पॅकिंग केलेले फ्रोझन फूड किती काळ वापरावे आणि ते खराब झालेले कसे ओळखावे असा प्रश्न अनेकांना पडतो.
फ्रोझन फूड जास्त काळ टिकते हे खरे असले तरी ते नेमके किती काळ टिकते याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे फ्रोझन फूड खराब झाले असेल तर ते ओळखता येणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला यासाठी काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
या टिप्सने ओळखा खराब झालेले फ्रोझन फूड
– E Times मध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर फ्रोझन फूडला काहीसा वेगळा वास येत असेल. तर तुम्ही जास्त विचार न करता ते लगेच फेकून देणे चांगले.
– बऱ्याचदा फ्रोझन फूडच्या पॅकेटमध्ये बर्फाचे क्रिस्टल्स पसरलेले दिसतात. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक नाही, परंतु त्यामुळे अन्नाची चव आणि पोत या दोन्हींवर वाईट परिणाम होतो.
– फ्रीझ केलेल्या पदार्थांचा रंग बदलणे हेदेखील ते खराब झाल्याचे लक्ष असते. उदाहरणार्थ स्टोअर केलेले मांस नेहमीच्या लाल रंगाऐवजी थोडे राखाडी होऊ लागते. भाज्यांच्या बाबतीतही असेच आहे. जर ते त्यांचा रंग बदलला असेल तर ते यापुढे न खाणे चांगले.
– फ्रीझ केलेल्या मांसामध्ये गुलाबी रंगाचा रस किंवा पाणी गळाल्यासारखे दिसले. तर ते मांस तुम्ही त्यानंतर खाऊ शकणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुमच्या फ्रीझरचे तापमान स्थिर नाही. त्यामुळे मांस वितळून पुन्हा गोठले आहे.