सोन्याच्या दागिन्याना 1 जून 2021 पासून हॉलमार्किंग केलेले असणे आवश्यक आहे. सध्या त्यावर कोणतीही सक्ती नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने 15 जानेवारी 2021 पासून सोन्याचे दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. दागिन्यांच्या हॉलमार्किंगची तयारी करण्यासाठी आणि भारतीय मानक ब्युरोमध्ये (BIS) नोंदणी करण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधी देण्यात आला. कोरोना साथीच्या काळात सराफा व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जून 2021 मध्ये ही मुदत वाढविण्यात आली.
मुदत वाढवण्याची कोणतीही मागणी नाही
ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी आभासी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात ते म्हणाले की, “मुदत वाढवण्याची कोणतीही मागणी नाही. BIS ज्वेलर्सना हॉलमार्किंग मंजूर करण्यात गुंतलेली आहे. आम्ही जूनपासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्यास तयार आहोत, असे बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी सांगितले. आमच्याकडे ही तारीख वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. “आतापर्यंत 34,647 ज्वेलर्सनी BIS कडे नोंदणी केली आहे.
ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की, येत्या एक-दोन महिन्यांत नोंदणीचा आकडा एक लाखापर्यंत जाईल. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आणि स्वयंचलित केली गेलीय. “1 जूनपासून सराफा व्यापाऱ्यांना केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विक्री करण्याची परवानगी दिली जाईल.
BIS नुसार, हॉलमार्किंग सक्तीचे केल्यानंतर ग्राहकांना प्रमाणित शुद्धतेचे दागिने मिळणार आहेत आणि फसवणूक कमी होणार आहे. भारत सोने आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. बहुतेक मागणी ज्वेलरी इंडस्ट्रीकडून येत आहे. व्हॉल्यूमच्या बाबतीत सांगायचे झाल्यास भारत दरवर्षी 700-800 टन सोन्याची निर्यात करतो.