भारतात निम्म्यापेक्षा
अधिक लोकांचे लसीकरण
भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. देशात पात्र लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलंय. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ट्वीट करून माहिती दिली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या देशात आतापर्यंत १२७.६१ कोटींहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत १,०४,१८,७०७ जणांना करोना लस देण्यात आली.
स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे
बळ शिक्षणाने द्यावे : मोहन भागवत
नवीन शिक्षण नीती लिखित आणि मौखिक तयार झालेली आहे. पण अजून ती लागू व्हायची आहे. मात्र या नव्या धोरणातील शिक्षणाने इतका आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे की आपल्या मनगटाच्या बळावर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी स्वत:च्या पायावर उभा राहून शकेन, असे मत स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
नागालँडमधील गोळीबारात
१३ नागरिकांचा मृत्यू
नागालँडमधील मोन जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली. आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकारामुळे नागालँडमध्ये खळबळ उडाली असून मुख्यमंत्री नैफियू रिओ यांनी तातडीने घडलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटेनवरून राहुल गांधी यांनी भारत सरकार आणि गृहमंत्रालयावर निशाणा साधला आहे.
ओमायक्रॉनचा एक रुग्ण
दिल्लीत सापडला
जगभराची चिंता बनलेल्या ओमायक्रोनने भारतात एन्ट्री केलीच होती. तर आता राजधानी दिल्लीत देखील ओमायक्रॉनचा रूग्ण सापडला असल्याची माहिती आहे. यापूर्वी महाराष्ट्रात देखील कल्याण डोंबिवलीमध्येही ओमायक्रॉनचा रूग्ण सापडला होता. यामुळे आता देशातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. महाराष्ट्र, गुजरातनंतर आता दिल्लीतही ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडलाय. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली आहे.
साहित्य संमेलनात कोरोनाचे
दोन रुग्ण सापडले
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलनात आज कोरोनाचे दोन रुग्ण सापडले. हे दोन्ही रुग्ण पुण्याहून आले होते. त्यांची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना साहित्य संमेलनात प्रवेश नाकारण्यात असून त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळा भरला आहे. या संमेलानासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आहेत.
साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर
शाई फेकण्याचा प्रकार
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलन स्थळी शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेडनं ही शाईफेक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून ते दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अशा प्रकारे शाईफेक करून भ्याड हल्ला करणं निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागली आहे.
1400 रुपयात विमान प्रवास शक्य
इंडिगोने अधिकृतपणे ट्विट करून आपल्या ग्राहकांना सांगितले की, ‘थेट कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास अधिक सोपा होईल आणि पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अनोखा अनुभव मिळेल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यातही सोयीचे होईल. याआधी, इंडिगोने 2 नोव्हेंबर 2021 पासून शिलाँग आणि दिब्रुगड दरम्यान थेट उड्डाण सुरू केले आहे. त्याचे सुरुवातीचे भाडे फक्त 1400 रुपये आहे.
दुसऱ्या कसोटीत भारताने दिले
न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज या कसोटीचा तिसरा दिवस असून भारताने न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ७ बाद २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील दमदार कामिगिरी केलेल्या एजाजने या डावात चार विकेट घेतल्या. न्यूझीलंडने भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली आहे.
SD social media
9850 60 3590