महाराष्ट्रात अंतर्गत रेल्वे नेटवर्कबाबत उदासीनता; गुजरातसह इतर राज्यांत जाण्यासाठी मात्र अनेक गाड्या
महाराष्ट्रातून गुजरात आणि इतर राज्यांत जाण्यासाठी दिवसभरात अनेक रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. परंतु, राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अत्यल्प आहे. त्याचा फटका विद्यार्थी, युवक, व्यावसायिकांना बसत आहे.मुंबई राज्याची राजधानी आहे तर नागपूर उपराजधानी. औरंगाबाद आणि नांदेड मराठावाड्यातील प्रमुख शहर आहेत. या शहरांचे राज्यातील इतर भागाशी जुळणे अपेक्षित आहे. परंतु, चित्र उलट आहे. महाराष्ट्राला देशातील इतर राज्यांशी जोडणाऱ्या भरपूर गाड्या आहेत. गुजरातमधील अहमदाबादसाठी तर मुंबईहून दिवसभरात तब्बल ३३ रेल्वेगाड्या आहेत. याउलट नागपूर उपेक्षितच आहे. नागपूरमार्गे देशाच्या सर्वच भागात रेल्वेगाड्या धावतात. मात्र, यापैकी अनेक रेल्वेगाड्यांना स्थानिक कोटा नाही किंवा त्यांच्या वेळा सोयीच्या नाहीत.
“…तर तुमची तिरडी बांधली जाईल”, हिंदूराष्ट्राची मागणी करताना धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
पुण्यात सोमवार ते बुधवार हे तीन दिवस बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग व दरबार कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे. धीरेंद्र शास्त्री हे सत्संग आणि दरबारच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदीविरोधी भाष्य आणि अंधश्रद्धला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती, दावे करत असतात. त्यावर महाराष्ट्र अंनिसने आक्षेप घेऊन बाबांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत हिंदूराष्ट्राची मागणी केली आहे.
हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? असा प्रश्न विचारला असता धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “त्यांना कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लीम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचं आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता… हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही… हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल.”
शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी; हर्षवर्धन सादगीर ठरला ६५वा उपमहाराष्ट्र मल्ल
शिवराज राक्षे या पैलवानाने धाराशिव येथील ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर स्वतःचे नाव कोरले आहे. महाराष्ट्र केसरी किताबाचा राक्षे दुसऱ्यांदा मानकरी ठरला आहे. शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर या दोघात महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत झाली. अत्यंत कडव्या आणि अटीतटीच्या लढतीत राक्षे याने सादगीरला धूळ चारत मानाची गदा पटकावली
“मोदी त्यांच्या बेडरूममध्ये किंवा बाथरूमध्ये…”, माजी भारतीय क्रिकेटपटूनं ‘या’ कृतीवर घेतला तीव्र आक्षेप!
रविवारी झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच तमाम भारतीयांचा स्वप्नभंग झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला विश्वचषक देण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली, त्यांची समजूत काढली. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे मोदींच्या या कृतीचं सत्ताधारी पक्षांकडून समर्थन केलं जात असताना दुसरीकडे विरोधकांकडून त्यावर टीका केली जात आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी या प्रकारावरून मोदींवर परखड शब्दांत टीका केली आहे.
भारतात झालेल्या विश्वचषकाने रचला इतिहास!आयसीसीची सर्वाधिक पाहिली जाणारी ठरली स्पर्धा
भारताने आयोजित केलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ने अनेक विक्रम केले. या विश्वचषकात भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनेक विक्रम केले, मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या स्पर्धेदरम्यान १२,५०,३०७ लोकांनी स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहिले. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत पहिल्यांदाच १२ लाखांहून अधिक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले, त्यामुळे प्रेक्षकांच्या संख्येत एक नवा विक्रम निर्माण झाला. एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय आयसीसी स्पर्धा ठरली आहे.सोशल मीडियावर पाहणाऱ्यांची संख्या देताना आयसीसीने असेही म्हटले आहे की, “आजपर्यंतच्या दर्शकांची ही सर्वात मोठी संख्या आहे. याबरोबरच आयसीसीने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. या स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळले गेले आणि ४२व्या सामन्यातच मैदानावर पोहोचलेल्या आणि सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होता, जो २०१९च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात विश्वविक्रम झाला. आयसीसी विश्वचषकातील हा सर्वात जास्त पाहिला गेलेला पहिला सामना होता.
मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या लष्कर ए तैयबाविरोधात इस्रायल आक्रमक
मुंबईत दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या लष्कर ए तैयबावर इस्रायलने बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेला घातक म्हणत त्यांनी दहशतवादी संघटनाच्या इस्रायली यादीत समावेश केला आहे. भारतातील इस्रायल दूतावासाने याबाबतची माहिती दिली.२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईच्या ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेने हल्ले चढवले होते. यामध्ये शेकडो नागरिकांचे प्राण गेले, तर कोट्यवधींची वित्तहानी झाली होती. या घटनेचे पडसाद जगभरातून उमटले होते. या हल्ल्याच्या जखमा मुंबईकरांच्या काळजातून अद्यापही सुकलेल्या नाहीत. यंदा या घटनेला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने इस्रायलने त्यांच्या देशाने तयार केलेल्या दहशतवादी संघटनेच्या यादी टाकलं आहे. याबाबतची माहिती भारतातील इस्रायल दूतावासाने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.
अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी तीन हजार अर्ज
अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी एक दोन नाही तीन हजार अर्ज आले. त्यापैकी २०० लोकांची निवड मुलाखतीसाठी झाली आहे. त्यांना विचारले जाणारे प्रश्न चर्चेत आहे. मकर संक्रांत झाल्यानंतर २२ जानेवारी २०२४ या दिवशी रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत.अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितलं २०० जणांची निवड त्यांच्या योग्यतेच्या आधारे झाली आहे. आता त्यांची मुलाखत घेतली जाते आहे. या सगळ्यांच्या मुलाखतीचं केंद्र हे अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचं मुख्यालय असलेल्या कारसेवक पुरम आहे. अयोध्येतले दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास आणि वृंदावनचे जयकांत मिश्रा या तिघांचं पॅनल या सगळ्यांची मुलाखत घेतं आहे.
१० दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचला कॅमेरा
उत्तराखंडमधील उत्तरकाशीतल्या सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकाचे प्रयत्न चालू आहेत. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्यावरील टेकडीला उभा छेद देऊन ‘प्रवेश मार्ग’ तयार करण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले आहेत. परंतु, अद्याप त्यात यश आलेलं नाही. दरम्यान, बोगद्यात आडकलेल्या मजुरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बोगद्यात अडकलेले सर्व मजूर दिसत आहेत. बचाव पथकाने मजुरांपर्यंत एका नलिकेद्वारे (पाईप) अन्न पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. याच पाईपमधून त्यांच्यापर्यंत कॅमेरा पोहोचवण्यात आला.
मजुरांपर्यंत अन्न आणि पाणी पोहोचवण्यासाठी सहा इंची नलिका टाकण्यात आली आहे. या नलिकेच्या मदतीने मजुरांपर्यंत खिचडी आणि पाणी पोहोचवण्यात आलं. तसेच कॅमेऱ्याच्या सहाय्याने बोगद्यातली परिस्थिती पाहता आली. आतमध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर आतमध्ये अडकलेल्या मजुरांनी सुरक्षा हेल्मेट घातल्याच व्हिडीओत पाहायला मिळालं.
“विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना पालकच जबाबदार”, ‘कोटा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं वक्तव्य
कोटामधील (राजस्थान) विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या पालकांना जबाबदार ठरवलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोटासह देशभरातून येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांनी देश हादरला आहे. कोटा शहरात यावर्षी तब्बल २४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी कोटासह देशभरातील कोचिंग सेंटर्स रेग्युलेट करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी सोमवारी (२० नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली.
चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मंजूर
कौशल्य विकास महामंडळ घोटाळाप्रकरणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाने नायडू यांच्या चार आठवडय़ांच्या अंतरिम वैद्यकीय जामिनाचे नियमित जामिनात रूपांतर केले आणि चंद्राबाबूंना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.
बायजूवर ईडीची धाड, ९ हजार कोटींची घोटाळा पकडला
मुलांना डिजिटल शिक्षण देणाऱ्या बायजू या कंपनीमध्ये एक मोठी अफरातफर आढळून आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ईडीने बायजूशी संबंधित कार्यालये आणि इतर परिसरांवर छापे टाकून झडती घेतली होती. कंपनीशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि डिजिटल डेटाही जप्त करण्यात आला आहे. यानंतर तपासादरम्यान ईडीला बायजूने परकीय चलन कायदा (FEMA) संबंधित अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. हा गैरव्यवहार सुमारे ९ हजार कोटी रुपयांचा आहे. स्टार्टअप क्षेत्रातील कंपनी असल्याने बायजूला परदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे.
ट्रेनमध्ये एसी अन् पंखे चालत नव्हते, कोर्टाने रेल्वेला ठोठावला १५ हजारांचा दंड
न्यायालयाने निष्काळजीपणासाठी रेल्वेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गरीब रथ ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एसी किंवा पंखे सुरू नसल्याची तक्रार एका प्रवाशाने केली होती. त्यामुळे डब्यात हवेचा तुटवडा निर्माण झाला होता. घुटमळणाऱ्या वातावरणात प्रवास करताना त्याला गैरसोय सहन करावी लागली. या प्रकरणी न्यायालयाने दक्षिण मध्य रेल्वेच्या विरोधात निकाल देत दंड ठोठावला.
‘ॲम्वे’कडून बहुस्तर साखळी योजनेतून ४,००० कोटींची लुबाडणूक! ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल
थेट विक्री क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी ‘ॲम्वे इंडिया’ने मल्टी लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) म्हणजे बहुस्तर साखळी धाटणीच्या व्यवसायाद्वारे ४,००० कोटी रुपयांहून अधिक मोठ्या रकमेची लुबाडणूक केली गेली आणि त्यातील ७० टक्के रक्कम परदेशी बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली गेली, असे आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात आहेत.लाभांश, स्वामित्व हक्क (रॉयल्टी) आणि इतर खर्चाच्या पूर्ततेच्या नावाखाली सदस्यांकडून गोळा केलेले २,८५९ कोटींहून अधिक रुपये परदेशी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात वळते केले गेले, असे तपास यंत्रणेने ॲम्वेविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. फिर्यादीची आर्थिक गैरव्यवहारासंबंधीची तक्रार हैदराबादमधील विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ज्याची सोमवारी त्याची दखल घेतली, असे ईडीने सांगितले.
‘संगीत देवबाभळी’ नाटक घेणार रसिकांचा निरोप; शेवटच्या प्रयोगापूर्वी दिग्दर्शकाची भावुक पोस्ट
गेल्या काही दशकांमध्ये अनेक उत्कृष्ट मराठी नाटकांची निर्मिती झाली. त्यापैकी एक नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी’. २२ डिसेंबर २०१७ रोजी हे नाटक मराठी रंगभूमीवर आले. गेल्या पाच वर्षांत या नाटकाला राज्यभरातील प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. आता लवकरच हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कार्तिक एकादशीच्या मुहूर्तावर नाटकाचा शेवटचा प्रयोग रंगणार असल्याची घोषणा नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी केली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शालिनी-मल्हार परत एकत्र येणार?
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही चांगलीच लोकप्रिय ठरली. या मालिकेचे आता नवं पर्व सुरु झालं आहे. यात शिर्के कुटुंबाचा अंत दाखवून मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत मल्हार हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता कपिल होनरावने एक्झिट घेतली. नुकतंच त्याच्यासाठी शालिनीने एक पोस्ट शेअर केली आहे.‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शालिनी हे पात्र माधवी निमकर साकारत आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर तिने मल्हारबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या पोस्टमध्ये तिने त्याचे आभार मानले आहेत.
SD Social Media
9850603590