राज कुंद्राच्या अटकेमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅट मुख्य कारण

अश्लील चित्रपट प्रकरणात शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. राज कुंद्राला अटक करण्यात आली. अटकेपूर्वी राज कुंद्राची मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली होती, त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले.

यानंतर त्याला थेट मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात आणून मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता, काल (19 जुलै) रात्री राज कुंद्राच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांच्यावर आयपीसी कलम 420 आणि 67 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात जामीनाची तरतूद नाही.

राज कुंद्राचा प्रदीप बक्षी नावाचा जोडीदार ज्याच्याबरोबर राज कुंद्राची व्हॉट्सअॕप चॅट समोर आली आहे. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून उघडकीस आले आहे की, राज कुंद्रा स्वत: अश्लील चित्रपटांच्या निर्मितीपासून ते त्यांच्या वितरणापर्यंतच्या सर्व व्यवसायांवर नजर ठेवत असे.

त्या चॅटमध्ये राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी प्रदीप बक्षी यांच्यामधील संभाषणामध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी दर आठवड्याला असा चित्रपट रिलीज करण्याविषयी बोलत होता. फेब्रुवारी महिन्यात वेब सीरीज बनवण्याच्या नावाखाली अश्लील चित्रपटांच्या शूटिंगच्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता. त्यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हाच हे चॅट रिट्रीव्ह केले होते.

या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये कुंद्राने लंडनमधील त्याची कंपनी चालवणाऱ्या प्रदीप बक्षीशी संभाषण केले होते, जे लंडनमधून वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर अश्लीलतेचे व्हिडीओ अपलोड करायचे. या संभाषणामध्ये दैनंदिन उत्पन्न वाढणार्‍या ग्राहकांचा उल्लेखही आहे. राज कुंद्रा या ग्रुपमध्ये दररोज सर्व तपशील घेत असत की, किती नफा झाला, किती तोटा होतो आणि व्यवसाय कसा वाढवता येतो, यावर चर्चा करत. दिवसाच्या कमाईचा हिशेबही ठेवला जात असे.

राज कुंद्राशी संबंधित या व्हॉट्सअॕप ग्रुपमध्ये 5 सदस्य होते. यामध्ये त्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत की, कोणती नायिका कधी बोलावायची, काय करायचे. त्यांच्याशी व्यवहार कसे करावे. त्यांना काय म्हणाचे आणि शूटसाठी त्यांना केव्हा कॉल करायचा. पोर्नोग्राफीमध्ये काम करणार्‍या अभिनेत्रीच्या पैशांच्या व्यवहाराचा पूर्ण उल्लेखही या व्हॉट्सअॕप चॅटमध्ये नोंदवला गेला आहे. राज कुंद्रा या चॅटमध्ये मार्केटींगची रणनीती, वाढती विक्री, मॉडेल्सचे पेमेंट आणि इतर सौद्यांविषयी बोलले जात असे. या व्हॉट्सअॕप ग्रुपचे नाव “एच” अकाउंट्स होते. राज कुंद्राच्या अटकेमध्ये हे व्हॉट्सअ‍ॅप चॅट मुख्य कारण ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.