गुरुतत्व मंचच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेनिमित्त निःशुल्क ऑनलाइन शिबिराचे आयोजन
हिमालयातील हा ध्यान प्रकार साधारण आठशे वर्षे जुना दिव्यसंस्कार आहे, जो प्रत्येक मनुष्य कुठल्याही किचकट पद्धती अथवा साधनेशिवाय प्राप्त करू शकतो. ‘जिवंत गुरूंच्या सान्निध्यात आत्मसाक्षात्कार मिळवण्याची एक अनमोल संधी आहे. ह्या ३ दिवसांत सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी, यांनी अनेक वर्षांच्या साधनेद्वारा प्राप्त केलेले, आध्यात्मिक ज्ञान, अगदी सहज आणि सोप्या भाषेत विशद करणार आहेत.
आपण सर्व ह्यां चैतन्याची अनुभुति घेण्याची संधी आपल्याला 23, 24, 25 जुलै 2021 या कालावधीत रोज सकाळी 6 वाजता उपलब्ध झाली आहे. ह्या दरम्यान सर्वांना स्वामीजींबरोबर आणि लाखो लोकांच्या सामूहिकतेमध्ये, सामूहिक ध्यान करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनद्वारा संचलित गुरुतत्व हा एक वैश्विक मंच आहे, जो प्रत्येक मनुष्याच्या आध्यात्मिक विकासासाठी कार्यरत आहे. ‘ गुरुतत्त्व’ स्वतः, श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या मंगलमय सान्निध्यात ह्या महाशिबिराचे आयोजन करत आहे, ज्याच्या माध्यमातून, लाखो लोकांना हिमालयातील ह्या अनमोल ध्यानाची अनुभूती प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे.
शिवकृपानंद स्वामीजी साक्षात्कारी ऋषी
सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी एक साक्षात्कारी ऋषी आहेत. बालपणापासून ते सत्याच्या शोधात होते. ते संपूर्ण जीवन साधनारत होते, जवळजवळ १६ वर्षे त्यांनी हिमालयातच ध्यान साधना केली आणि तिथे वास्तव्यास असलेल्या गुरूंच्या (ज्यात जैनमुनी, बौद्ध कैवल्यकुंभक योगी ह्यांचा समावेश आहे.) सान्निध्यात आध्यात्मिक ज्ञान मिळवले. ते हिमालयातील हा अनुभूती प्रधान अमूल्य ध्यानयोग १९९४ सालापासून देश- विदेशांमध्ये नि:शुल्क वाटत आहेत.
हिमालयातील ८०० वर्ष जुना पौराणिक ध्यान संस्कार ग्रहण करण्याची नि:शुल्क आॕनलाइन संधी.
गुरुतत्वाने Gurutattva.org चॅनलवर या साईटवर २३,२४,२५, जुलै गुरुपूर्णिमा महाशिबिराचे नि:शुल्क थेट प्रक्षेपण आयोजित केले आहे.
गुरुपूर्णिमा महाशिबिराबद्दलच्या सर्व सूचना Facebook आणि instagram च्या माध्यमातून @gurutattvameditation वर नियमित दिल्या जातील.