राज्यातील 20 जिल्ह्यांत तापमान 35 अंशांच्या पुढे, फेब्रुवारीत उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त

यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसू लागल्याने कमाल तापमान पुढच्या काही काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद होत आहे. तर उत्तरेतील काही जिल्ह्यात दिवसा उन्हाच्या झळा तर रात्रीच्यावेळी थंडी जाणवत आहे. यामुळे कमाल आणि किमान तापमानातील चढ- उतार सुरूच आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता वाढत असतानाच उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारठा देखील कायम आहे. आज (ता. 24) कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात काही भागांत अंशतः ढगाळ हवामान असले, तरी स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत उन्हाळा वाढला आहे.

दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी 38.5 अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील वाशीम, ब्रह्मपुरी, वर्धा, मराठवाड्यातील नांदेड आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच गुरुवारी (ता. १३) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 7 अंश सेल्सिअस, तर धुळे येथे 8.4 अंश, तर जळगाव येथे 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात किमान तापमान 12 अंशांच्या पुढेच होते. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : अकोला 38.5, वाशीम 37.8, ब्रह्मपुरी 37.2, नांदेड 37.3, वर्धा 37, सोलापूर 37.4, नागपूर 36.8, जळगाव 36.6, अमरावती 36.4, चंद्रपूर 36.5, सांगली 36.3, यवतमाळ 36.2, परभणी 36.1, गोंदिया 36.

गारठा असलेली ठिकाणे : निफाड 7, धुळे 8.4, जळगाव 9.3.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.