सोशल मीडियावर एका मांजरीचा फोटो व्हायरल होत आहे. ही मांजर साधीसुधी नसून पदवीधर असल्याचा दावा तिच्या मालकिणीने केला आहे. मांजरीची मालकिण फ्रान्सिस्का बॉर्डियर यांनी टेक्सास विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. मात्र कोरोना काळात विद्यापीठात जाण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण घेतलं. अशा परिस्थिती तिची मांजर ‘सूकी’ ही सुद्धा लॅपटॉपसमोर येऊन बसायची. एखाद्या विद्यार्थ्यासारखी ती दररोज ऑनलाईन लेक्चरसाठी लॅपटॉपसमोर हजर असायची.
मांजर प्रत्येक लेक्चर काळजीपूर्वक समजून घेत होती फ्रान्सिस्का बॉर्डियर हिचा ग्रॅज्युएशनचा दिवस आला, तेव्हा तिने या खास दिवशी मांजर सूकीलाही सोबत घेतले. इतकंच नाही तर, मांजर देखील एका खास ड्रेसमध्ये समारंभात सहभागी झाली होती. मांजर ग्रॅज्युएशन ड्रेस आणि कॅपमध्ये बसलेली दिसत आहे. हा गोंडस क्षण फ्रान्सिस्काने तिच्या इंस्टाग्रामवर एका फोटोद्वारे शेअर केला आहे.
मांजरीच्या मालकिणीच्या म्हणण्यानुसार, ” हो, माझ्या मांजरीचे प्रत्येक झूम लेक्चरला हजेरी लावली आहे. त्यामुळे आम्ही दोघंही टेक्सास विद्यापीठातून पदवीधर झालो आहेत.” असं लिहिलं असून दोन स्माईली टाकल्या आहेत.
फ्रान्सिस्का बॉर्डियर हीने केलेल्या इन्स्टाग्राम फोटो पोस्टला अनेक युजर्सनी लाईक केलं आहे. मांजराला कोणतीही पदवी मिळाली नसली तरी अशा प्रकारे कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही देखील मोठी गोष्ट आहे.