अखेर तो दिवस आलाच! अक्षय कुमार सोडणार कॅनडाचं नागरिकत्व,पासपोर्ट बदलण्याची तयारी सुरु

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून अभिनेता अक्षय कुमारला ओळखलं जात. गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. त्याचा जबरदस्त चाहतावर्ग आहे. अक्षय नेहमीच हटके अंदाजात चाहत्यांशी संवाद साधत असतो. अक्षय आपल्या मजेशीर आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. तो फारच लवकर चाहत्यांशी जुळवून घेतो. परंतु असं असतानाही तो अनेकदा एका गोष्टीमुळे ट्रोल होत असतो. आणि ती गोष्ट म्हणजे अभिनेत्याकडे असलेलं कॅनडाचं नागरिकत्व. अनेकांना अक्षयची ही गोष्ट रुचत नाही. भारतात राहून, हिंदी सिनेमातू प्रसिद्धी मिळवून अक्षयचं कॅनेडियन नागरिकत्व जपणं अनेकांना खटकतं. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे.

अक्षय कुमार सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अभिनेता वर्षातून किमान दोन ते तीन सिनेमे करतच असतो. अक्षयचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावतो. सध्या तो आपल्या ‘एल्फि’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो नुसरत भरुचा आणि इम्रान हाशमीसोबत दिसणार आहे. कलाकार या सिनेमाचं दणकून प्रमोशन करत आहेत. अक्षय आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हटके फंडे अवलंबत आहे. त्यामुळे हा सिनेमा आणि कलाकार सोशल मीडियावर सध्या चर्चेत आले आहेत.

दरम्यान एका मुलाखतीत अक्षय कुमारने आपल्या कॅनेडियन नागरिकत्वावर मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने आपल्यासाठी भारतच सगळं काही असून आपण कॅनेडियन नागरिकत्व सोडत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासाठी आता अभिनेत्याने आवश्यकती प्रक्रियाही सुरु केली आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, याबाबत बोलताना अक्षय कुमारने म्हटलं, ‘लोक या विषयावर नेहमीच मला सुनावत असतात. मला नेहमीच या गोष्टीमुळे टोमणे ऐकावे लागतात. त्यामुळे आपल्याला वाईट वाटत असल्याचंही अभिनेता म्हणाला. अक्षय पुढे म्हणाला, ‘माझ्यासाठी भारतच सगळंकाही आहे. मी जे काही कमावलं आहे ते इथे राहून..मी स्वतः ला नशीबवान समजतो कि, मला त्याची परतफेड करण्याची संधी मिळत आहे. मला वाईट वाटत जेव्हा लोक माझ्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. लोकांना या सर्व गोष्टीबाबत काहीही माहिती नाहीये परंतु सर्वजण मनात येईल ते बोलत राहतात’.

कसं मिळालं कॅनडाचं नागरिकत्व?

याबाबत सांगताना अक्षय म्हणाला, 1990-2000 मध्ये माझे सर्व चित्रपट फ्लॉफ होत होते. त्यामुळे मला वाटलं आता माझं काहीही होऊ शकत नाही. माझा एक मित्र कॅनडामध्ये स्थायिक होता. त्यामुळे मी तिथे जाऊन काम करायचं ठरवलं होतं. आणि म्हणूनच मी कॅनडाच्या नागरिकत्वाची अर्ज केला होता. आणि त्याकाळात माझ्या हातात फक्त 2 सिनेमे होते जे रिलीज होणार होते. आणि नशिबाने ते दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. त्यामुळे माझ्या मित्राने मला परत इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करण्याचा सल्ला दिला. तेव्हा मला लक्षातही नव्हतं की मी आता माझ्या पासपोर्टवर कॅनेडियन नागरिकत्व लागलं आहे. आणि ते बदलायची गरज पडेल असंही वाटलं नव्हतं’. असं अक्षयने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.