साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिंदे गटात जुंपली, शंभूराजेंची रामराजेंवर खरमरीत टीका

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून शिंदे गट आणि भाजपकडून  राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वारंवार निशाणा साधला जात आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातही शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला होता. यावर राज्याचे उत्पादन शुल्क  मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजुनही 15 वर्षे सत्तेत येऊ शकत नसल्याचा दावा केला आहे. ते काल माध्यमांशी बोलत होते.

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी रामराजे नाईक- निंबाळकर यांचा समाचार घेत म्हणाले की, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही. जर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेतून बाजूला गेली की लोकशाही धोक्यात आली, असे रामराजे म्हणतात.

तर मला पण राजे साहेबांना सांगायचं आहे. आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे. लोकशाही मार्गानेच सभापती यांची निवड केली आहे. आपणही विधानपरिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहेत, असं मंत्री देसाई यांनी म्हंटले आहे.

याशिवाय राम राजे नाईक-निंबाळकर यांनी स्वतः पुरते पाहू नये, आजही सत्तेत येण्यासाठी बहुमताला महत्व आहे. त्यांना खंत याची आहे की त्यांचा पक्ष सत्तेत नाही, सत्तेत नसल्यामुळे लोकशाही धोक्यात किंवा टिकणार नाही असे म्हणून चालत नाही.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील काही नेत्यांना सत्तेविना राहवत नाही, सत्तेविना ते राहू शकत नाही. सत्तेविना ते तळमळत आहे, याशिवाय पुढील अडीच वर्षे काय पुढील दहा ते पंधरा वर्षे ते तळमत राहील, अशा खरमरीत शब्दात शंभूराजे देसाई यांनी टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.